22 January 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

राजगृह तोडफोड प्रकरणी एका संशयिताला अटक, राजगृहला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण

Dr Babasaheb Ambedkar, Rajgruh residence, Mumbai, Permanent police Protection

मुंबई, ८ जुलै : राजगृहाला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या काचांवर दगडफेक केली गेली आणि कुंड्यांचेही मोठे नुकसान केले गेले. आंबेडकर कुटुंबियांकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

राजगृहावरील हल्ल्यानंतर राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘राजगृह’ला कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांनी ही मागणी केली आणि ती मागणी तातडीनं मंजूर झाली, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

 

News English Summary: The demand of the people of Ambedkar and the Ambedkar family to protect the palace has been met. This was discussed at today’s cabinet meeting. After that, the meeting unanimously decided to provide 24-hour protection to the palace.

News English Title: Dr Babasaheb Ambedkar Rajgruh residence in Mumbai will have a permanent police presence News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x