23 February 2025 10:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबईतील खड्ड्यामुळे आई व तिच्या ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील खड्यांमुळे अजून २ निरपराध प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रवासादरम्यान रस्त्यावर अचानक समोर आलेला खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरून दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये आई आणि तिच्या ११ महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्या मुलाचे पिता सुद्धा जबर जखमी झाले आहेत. गोवंडी प्रवासादरम्यान नुकताच हा अपघात घडला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या आईचे नाव पूजा आणि ११ महिन्याच्या चिमुकल्याच नाव समर्थ असल्याचं समजतं. तर पिता प्रमोद घडशी हे सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी देवनार पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जखमी झालेले मोद घडशी हे कांजूरमार्ग येथील द्वारकामाई हाऊसिंग सोसायटीमध्ये त्यांच्या सासुरवाडीला वास्तव्यास होते. दरम्यान, घडशी कुटुंबियांचे मानखुर्द येथे घर असून त्याठिकाणी पत्नी आणि मुलासह ते त्यांच्या दुचाकीने शनिवारी गेले होते. मध्यरात्री एकच्या सुमारास ते पुन्हा परतत असताना त्यांच्यामागे महापालिकेचा डम्परचालक जोरात हॉर्न वाजवत घडशी यांच्या दुचाकीजवळ आला. परंतु, काळोखात हॉर्नच्या आवाजाने दचकलेल्या प्रमोद यांनी मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवर, लोटस जंक्शनजवळ दुचाकी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु, नेमका त्याचवेळी समोरचा खड्डा चुकवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्या गडबडीत त्यांचा बाईकवरील ताबा सुटला आणि तिघे सुद्धा खाली कोसळले. मात्र दुर्दैवाने डम्पर अगदी जवळ असल्याने पूजा आणि समर्थ हे दोघेसुद्धा डंपरखाली चिरडले गेले. तिघांनाही पोलिस आणि नागरिकांनी रुग्णालयात नेले. मात्र त्याआधीच पूजा आणि समर्थला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x