7 January 2025 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स Redmi 14C 5G | 10 हजारांचा बजेट असेल तर, Redmi 14C 5G सिरीजवर मिळतेय बंपर सूट, फीचर्सबद्दल जाणून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये तेजीचे संकेत, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch Bharat Dynamics Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार स्टॉक, टार्गेट नोट करा - NSE: BDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंगसह टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN IRB Infra Share Price | 58 रुपयांच्या आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
x

VIDEO | रहिवासी सोसायटीकडून विहिरीच्या अर्ध्या भागावर RCC | त्यावरच कार पार्क | कार पाण्यात बुडाली

Mumbai Rain

मुंबई , १३ जून | मागील ४ दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्ते, नाले तुंबल्याचे समोर आले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली होती. मात्र ३-४ दिवसात महिन्याभराचा पाऊस पडल्याने मुंबई शहरात धक्कादायक प्रकार घडताना दिसत आहेत.

तेच सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली असून घाटकोपर परिसरातील ही घटना आहे. येथे एका घरासमोर कार पार्क केलेली दिसतेय. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात बरेच पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे घाटकोपरचा हा भाग भुसभुशीत झाला आहे. कारच्या समोर असलेल्या जमिनीवर खड्डा पडल्यामुळे या खड्ड्यामध्येही चक्क पाणी जमा झाले आहे. याच खड्ड्यात एक कार पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. कारसमोरचा खड्डा हा जास्त खोल नसावा असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते. मात्र, कार जशीजशी या खड्ड्यात जाते; तसेतसे हा खड्डा किती धोकादायक आणि खोल असावा हे आपल्याला समजते. कार खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती अवघ्या काही सेकंदामध्ये गायब झाली आहे.

सत्य परिस्थिती काय?
घाटकोपर पश्चिम कामा लेन येथील त्रिभुवन मिठाईवाला दुकानाच्या मागे रामनिवास या जुन्या सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार अचानक पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे. या अनुषंगाने महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना रविवार १३ जून २०२१ रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर कारमध्ये कोणीही नसल्याने घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही, तसेच कोणीही जखमी झालेले नाही.

 

News Title: Due to RCC on half potion of residence society parked car sunk in ditch at Ghatkopar Mumbai news updates.

 

हॅशटॅग्स

#Raining(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x