15 November 2024 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL
x

२०१८ | मुख्यमंत्री, गृहमंत्री फडणवीस होते | मग अर्णबला VIP ट्रीटमेंट अन पोलिसांवर दबाव नेमका? सविस्तर वृत्त

Arnab Goswami, Devendra Fadnavis

मुंबई, ४ नोव्हेंबर: आज अर्णब गोस्वामीला अटक झाली आणि अन्वय नाईक या मराठी उद्योजकच्या पत्नीने आणि मुलीने पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, त्यांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी अन्वय नाईक यांची पत्नी अक्षता नाईक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनाक्रम माध्यमांच्या समोर कथन केला.

त्यानंतर Republic TV’चे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर अक्षता नाईक आणि आज्ञा नाईक या मायलेकींनी पत्रकार परिषद घेतली आणि अनेक मुद्दे माध्यमांसमोर मांडले. माझ्या नवऱ्याने सुसाईड नोटमध्ये तिघांची नावं लिहिली होती, पण त्यांच्यावर काहीही कारवाई झाली नव्हती, आज महाराष्ट्र पोलिसांनी कारवाई केली, मी त्यांची शतश: आभारी आहे, असं अक्षता नाईक म्हणाल्या. अर्णव गोस्वामींसारखी माणसं काम करुन घेतात आणि पैसे देत नाहीत. अर्णव यांनी सूडबुद्धीने हे सर्व केलं आहे, माझ्या पतीला पैसे मिळाले असते तर ते जिवंत असते, तब्बल 83 लाख रुपये बाकी आहेत, फिरोजकडून ४ कोटी, इतरांकडून येणं होतं, पण तेही देऊ नका असे अर्णवने सांगितल्याचा धक्कादायक दावा अक्षता नाईक यांनी केला.

आम्ही जगायचं नाही का, फक्त अर्णव गोस्वामीला जगायचा अधिकार आहे का? पत्रकारिता अशी असते का? आमचे फोन टॅप केले होते, आम्ही संजय बर्वे, सुरेश वऱ्हाडे यांनाही भेटलो होतो. अर्णव गोस्वामींना अटक झाली हे खूप चांगलं झालं, त्या तिघांची नावं सुसाईड नोटमध्ये लिहिली आहेत, त्यांना यापूर्वीच अटक व्हायला हवी होती, मात्र का झाली नाही, मला माहिती नाही, असंही अक्षता नाईक म्हणाल्या.

सुशांतसिंहबाबत एवढं सांगत होतो, त्यावेळी माझ्या पतीने त्याचं नाव सुसाईड नोटमध्ये नाव लिहिलं आहे, तरीही कारवाई झाली नाही. मला महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण जगातील लोकं सपोर्ट करतील असा मला विश्वास आहे. भारतातील लोकांनी सत्याचे समर्थन केले पाहिजे, यात राजकीय हस्तक्षेप करण्याची गरज नाही. आमचं प्रकरणं भटकवण्याचा प्रयत्न झाला आहे, मोदींनाही पत्र लिहिलं होतं, अशी माहिती अक्षता नाईक यांनी दिली.

या संपूर्ण प्रकरण २०१८ मधील असून त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील देवेंद्र फडणवीस हेच होते. नाईक यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्या प्रमाणे अर्णब गोस्वामींचा जवाब थेट जॉईंट सिपींच्या कार्यालयात नोंदवला गेला होता इतकी VIP ट्रीटमेंट त्यांना देण्यात आली. त्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील नाईक कुटुंबियांना तक्रार केल्यानंतर विषय न्यायालयात येणार असल्याचं सांगून एवढं का झुलवत ठेवलं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरण नेमकं कोणत्या बाजूने दाबण्यात आलं होतं आणि नाईक कुटुंबियांच्या तक्रारीला कोणी केराची टोपली दाखवली होती याचा पूर्ण अंदाज येऊ शकतो असं राजकीय विश्लेषक मत नोंदवत आहेत. कारण अर्णब गोस्वामीला अटक झाल्यानंतर भाजपने दिल्ली ते गल्ली केलेला थयथयाट भाजपवरीलच संशय गडद केला आहे..

 

News English Summary: This whole case is from 2018 and at that time Devendra Fadnavis was also the Chief Minister and Home Minister of the state. According to Anvay Naik’s family, Arnab Goswami’s response was reported directly to the Joint CP’s office, so much so that he was given VIP treatment. The question has also arisen as to why the senior police officer kept the Naik family in suspense saying that the matter would come up in the court after they lodged a complaint. Therefore, political analysts are reporting that it is possible to know from which side the entire case was suppressed and who showed the basket of bananas to the complaint of Naik family.

News English Title: During complaints against Arnab Goswami who was Chief Minister and Home Minister of Maharashtra news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x