22 April 2025 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | 4 रुपयांचा शेअर 101 रुपयांवर आला, जबरदस्त तेजीत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC Vikas Lifecare Share Price | शेअर प्राईस 2 रुपये 66 पैसे, पेनी स्टॉक जबरदस्त तेजीत, टार्गेट नोट करा - NSE: VIKASLIFE Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, चॉईस ब्रोकिंग फर्मने दिली अपडेट - NSE: SUZLON Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
x

राऊतांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या - फडणवीस

Ek Narad Shivsena Garad, opposition leader Devendra Fadnavis, Sharad Pawar, MP Sanjay Raut

मुंबई, ९ जुलै : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत लवकरच प्रसारित होणार आहे. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळत आहेत.

पण यात काही मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपचा जो १०५ आकडा आहे त्यात शिवसेनेचं पण योगदान होतं, मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचारधारेशी सुसंगत होती असं मला कधीच वाटलं नाही, तीन विचारांचे तीन पक्ष असले तरी पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठीमागे आहेत असं शरद पवारांनी सांगितले शरद पवारांची ही मुलाखत ११ ते १३ तारखेदरम्यान प्रसिद्ध होणार असून एक शरद, सगळे गारद या टायटलने ही मुलाखत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. मात्र मुलाखतीबाबत उत्सुकता वाढवण्यासाठी त्यातील काही भाग टिझरच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

दरम्यान पवारांच्या मुलाखतील संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले होतं आणि त्यालाच अनुसरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांना जोरदार टोला लगावला आहे. संजय राऊतांच्या या वाक्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टीपण्णी केली आहे. संजय राऊत यांची एक मुलाखत घ्या आणि त्याला ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे नाव द्या अशा संदेश मला व्हाट्सअप आल्याचा चिमटा फडणवीस यांनी काढला. तसेच, सामना हे सध्या बाळासाहेबांचा सामना राहिला नाही. सामना सध्या वाचतंच, कोण? असे म्हणत सामना वर्तमानपत्र आपण वाचत नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले.

 

News English Summary: Opposition leader Devendra Fadnavis has slammed Raut. Devendra Fadnavis has made a mischievous remark on this sentence of Sanjay Raut. Take an interview with Sanjay Raut and call him ‘Ek Narad, Shiv Sena Garad’.

News English Title: Ek Narad Shivsena Garad opposition leader Devendra Fadnavis slams Pawars interview trailer MP Sanjay Raut News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या