22 February 2025 11:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

आ. प्रताप सरनाईक यांचे निकटवर्तीय अमित चांदोळे यांना ईडीकडून अटक

Enforcement directorate, Amit Chandole, Money laundering, Tops security

मुंबई, २६ नोव्हेंबर: ‘टॉप्स सिक्युरिटी’ या समूहाविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीने बुधवारी (दिनांक.२५) संध्याकाळी पहिली अटक केली. सरनाईक यांचे जवळचे मित्र अमित चांदोळे यांच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. चांदोळे हे टॉप्स समूहाचे भागीदार आहेत.

मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांचे कंत्राट एमएमआरडीएला देण्यात आले होते. याचे सब कंत्राट चंडोले याच्या टॉप्स ग्रुपच्या खासगी सुरक्षा कंपनीला देण्यात आले होते. यातील १७५ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी ठाण्यात करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान हाती लागलेल्या कागदपत्रांच्या आधारे चंडोले कनेक्शन उघड़ झाले. त्यानुसार बुधवारी त्यांच्याकडे १२ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

चांदोळे यांच्या अटकेमुळे सरनाईक आणि राहुल नंदा यांच्यातील व्यवहारांबाबत माहिती समोर येईल अशी ईडीला आशा आहे. नंदा हे टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आहेत. या ग्रुपचे माजी सीईओ रमेश अय्यर यांनी नंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कंपनीच्या निधीचा बेकायदा पद्धतीने फेरफार केल्याचा आरोप केला आहे.

 

News English Summary: The Directorate of Recovery (ED) on Tuesday raided the house and office of Shiv Sena MLA Pratap Saranaik on charges of financial misconduct against a group called ‘Tops Security’. The ED made the first arrest in the case on Wednesday (25th) evening. Sarnaik’s close friend Amit Chandole has been arrested. Chandole is a partner of Tops Group.

News English Title: Enforcement directorate arrested Amit Chandole in an alleged money laundering case related to tops security News updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x