23 December 2024 8:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

चंद्रकांत खैरे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत: मनसे नेते हर्षवर्धन जाधव

Former MLA Harshvardhan Jadhav, MNS

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई व शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर मराठवाड्यात जोमानं कामाला लागणार असल्याचं सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. ‘चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असं भाकीतही त्यांनी वर्तवलं.

हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. मधल्या काळात अंतर्गत वादामुळं शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तसंच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मतं घेतली. त्यांच्या या मुसंडीमुळं शिवसेनेचे दिग्गज नेते खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला.

मुंबई आणि देशभरात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे. मनसेने भगव्या हिंदुत्वाचा राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतील नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यात मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यात २-३ महिन्यावर आलेल्या औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे, ते शिवसेनेचे नांदेडमधील प्रमुख पदाधिकारी होते.

राज ठाकरे देखील महामोर्चा पार पडल्यानंतर लगेचच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने मराठवाडा मनसेच्या अग्रस्थानी असणार आहे. लवकरच औरंगाबाद, नवी-मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महत्वाच्या महानगर पालिकेच्या निवडणुका असल्याने मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं असून तसेच संकेत सध्या या मेगाभरतीतून मिळत आहेत.

उद्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

 

Web Title:  Ex MLA Harshvardhan Jadhav says Chandrakant Chaire will never MP again in future.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x