अभिजित भुर्के यांचा 'राजकारणाच्या फडा'वरून थेट 'मनसे' राजकारणात प्रवेश
मुंबई : आज मुंबईमध्ये मनसेचा शिवतीर्थावर भव्य गुढीपाडवा मेळावा पार पडला. तुफान गर्दी उसळलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी अनेकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. सध्या समाज माध्यमांच्या आधारे देखील सुशिक्षित तरुणांना मनसे सारख्या आक्रमक आणि रस्त्यावरील लढाई लढणाऱ्या पक्षात प्रवेश करावासा वाटत आहे, ही पक्षासाठी जमेची बाजू आहे. त्याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजकारणाचा फड’ या फेसबुक ग्रुपचे मॉडरेटर अभिजित भुर्के यांनी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष जरी आक्रमक कार्यकर्त्यांचा असला तरी उच्च शिक्षण घेतलेल्या आणि उच्च पदावर काम करणारे तरुण जर मनसेत प्रवेश करत असतील तर त्यांच्या शिक्षणाचा उपयोग पक्षाची भविष्यातील निवडणूक रणनीती ठरवण्यासाठी तसेच तंत्रज्ञान आणि त्याचा नियोजनबद्ध वापर कसा करावा यासाठी करून घेणे गरजेचे आहे. पक्षातील प्रत्येकाची ताकद ही वेगवेगळ्या विषयात असते आणि ती पक्षाने ओळखणे आणि त्याला दिशा देणं गरजेचं आहे.
समाज माध्यमांच्या आधारे विविध पक्षातील तरुण अनेक फेसबुक ग्रुप्समध्ये एकमेकांसोबत जोडले जात आहेत. सध्या अनेक फेसबुक ग्रुप्स राजकारणासाठी स्थापन करण्यात आले आहेत, ज्यांचा मूळ उद्देश समाजात विकृती पसरवनं आहे. परंतु असे अनेक ग्रुप्स आहेत जे सामाजिक सलोखा राखण्याचे आणि काय चूकीचं आहे यासाठी देखील काम करताना दिसतात. त्यात ग्रुपच्या ऍडमिन आणि मॉडरेटरची भूमिका महत्वाची असते. ते जरी पूर्णवेळ त्यात नजर ठेवू शकत नसले, तरी वेळेप्रमाणे नियमांचे पालन होतं आहे की नाही किंवा नवे नियम आणून ग्रुप्समध्ये लोकशाही टिकवून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न करताना दिसतात असं आमच्या समाज माध्यमांच्या टीमचा अनुभव सांगतो. त्यातीलच एक ग्रुप म्हणजे ‘राजकारणाचा फड’ असं समजतं.
जगातील कोणतही तंत्रज्ञान नेहमी दोन प्रकारे उपलब्ध असतं, एक म्हणजे वापरणारा त्याचा सदुपयोग करतो की दुरुपयोग. फेसबुकचा दुरुपयोग २०१४ नंतर प्रचंड वाढला असून, आज २० ते २५ वयोगातील अनेक फेसबुक वापरकर्त्यांना देशातील १९९५ पूर्वीचा इतिहासाचं माहित नसल्याने, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करून चुकीचा भारत आणि राजकारण त्यांच्यावर लादलं जात आहे, हे अभ्यासाअंती स्पष्ट जाणवतं. त्यामुळे फेसबुकचा सदुपयोग करून अशा तरुणांचे समाज प्रबोधन करण्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन फेसबुक ग्रुप्सचा उत्तम सदुपयोग करता येऊ शकतो.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO