5 November 2024 6:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

२ दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटतात आणि आज पत्रकार परिषद

Former MP Nilesh Rane, Aaditya Thackeray, Mumbai Police Commissioner, press conference, Sushant Singh Rajput Suicide

मुंबई, ३ ऑगस्ट : ज्या राज्यात घटना घडली असेल त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या तपासाचा अधिकार कायद्याने मुंबई पोलिसांकडे असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. यामुळे बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह झालायं. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला. यावर मुंबई पोलिसांतर्फे आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळालाय.

एखादी घटना घडल्यानंतर झालेल्या पोलीस तपासात पहिला जबाब हा महत्वाचा मानला जातो. सुशांतच्या घरच्यांशी झालेल्या पहिल्या जबाबात त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. सुशांतवर सुरु असलेले उपचार आणि व्यावसायिक दडपणामुळे आत्महत्या केली असावी असे त्यांचे म्हणणे होते. पण त्यानंतर त्याच्या वडीलांना बिहारमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर सुशांतचे कुटुंबीय जबाबासाठी आले नाहीत आणि त्यांनी थेट बिहारमध्ये तक्रार केली.

सुशांत सिंह राजपूतनं १४ जूनला आत्महत्या केली. मात्र या प्रकरणी घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सुशांतनं आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या घरात पार्टी झाल्याची चर्चा होती. मात्र तशी कोणतीही पार्टी झालेली नसल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली. आम्ही या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र तसं काहीही हाती लागलं नसल्याचं परमबीर सिंह म्हणाले. मात्र या प्रकरणात काही घातपात झाला का, त्या अनुषंगानंदेखील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, यांचं विषयाचा धागा पकडून माजी खासदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना निलेश राणे यांनी म्हटलं आहे की, “दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस कमिश्नरांना भेटायला जातो त्या नंतर आज कमिश्नर प्रेस घेतात. काही तरी गडबड आहे हे न समजण्या इतकी लोकं मूर्ख नाही. जसे दिवस जातायत तसे T gang पुरावे नष्ट करत आहेत म्हणून रोज धडपड सुरू आहे.

 

News English Summary: The police of the state in which the incident took place are investigating the incident. Therefore, according to the law, Mumbai Police has the right to investigate Sushant’s suicide, said Police Commissioner Parambir Singh. This has called into question the Bihar police investigation.

News English Title: Former MP Nilesh Rane criticized Aaditya Thackeray over Mumbai Police Commissioner press conference on Sushant Singh Rajput Suicide case news latest updates.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x