3 December 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

बिहार निवडणूक | संजय राऊतांमुळे शिवसेनेची महाराष्ट्रातही अशीच अवस्था होईल

Former MP Nilesh Rane, Shivsena, MP Sanjay Raut, Bihar Assembly Election 2020

मुंबई, ११ नोव्हेंबर : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भारतीय जनता पक्षाला ७४ तर जेडीयूला अवघ्या ४३ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. यानिवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रीय जनता दल महाआघाडीकडून तेजस्वी यादव यांनी एकाकी झुंज दिली, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय जनता दलला ७५ जागा मिळाल्या तर काँग्रेस १९ जागांवर थांबली. बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टोलेबाजी करत आहेत.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

निलेश राणे यांनी सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होणारी शिवसेनेला मिळालेल्या मतांच्या यादीचा मजकूर पोस्ट करत, “वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन,” असं म्हटलं आहे.

दुसरीकडे, काँगसने महाराष्ट्रात “हातात” “धनुष्यबाण” धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला. आता महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या “घड्याळाचे” काय सांगावे टायमिंग…? अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यातील महाविकास विकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांवर केली.

 

News English Summary: Following this issue, BJP leader Nilesh Rane has castigated Shiv Sena and Shiv Sena MP Sanjay Raut. Nilesh Rane has said that Sanjay Raut will cause the same situation in Maharashtra as he did in Bihar.

News English Title: Former MP Nilesh Rane criticized Shivsena MP Sanjay Raut after Bihar Assembly Election 2020 news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x