10 January 2025 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Provident Fund | तुम्हाला सुद्धा 50 हजार पर्यंत पगार आहे का, तुमच्या EPF खात्यात 2.5 कोटी रुपये जमा होणार, कसे पहा Srestha Finvest Share Price | 75 पैशाचा पेनी शेअर फोकसमध्ये, जोरदार खरेदी, अप्पर सर्किट हिट करतोय - Penny Stocks List IREDA Share Price | पीएसयू IREDA कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL, तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: IREDA IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा - IPO Watch Flipkart Sale 2025 | नव्या वर्षाच्या फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर; लॅपटॉप, स्मार्टफोन आणि नवनवीन वस्तूंवर मिळणार बंपर डिस्काउंट Smart Investment | नुकतेच नोकरीला लागला असाल तर करा हे एक काम; कोटींच्या घरात पैसे कमवाल, जाणून घ्या सविस्तर माहिती Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
x

अजित पवारांनीच्या पहाटेच्या शपथविधि आडून निलेश राणें यांचं शिवसेनेवर टीकास्त्र

Former MP Nilesh Rane, Shivsena, Mahavikas Aghadi, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर : राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही आयपीएस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘लोकमत ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत केले होते. मात्र या विधानानंतर अनिल देशमुख यांनी त्याबाबत सारवासारव केली होती. त्यानंतर आता भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावे, यासाठी काही अधिकारी राबत होते, असा दावा शिवसेनेने केला आहे. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करत होते, असा दावा सामनात आज प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखामधून करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेच्या या दाव्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

शिवसेनेनं केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी ट्विट करून उत्तर दिलं. राणे यांनी अजित पवार यांनी केलेल्या बंडाचा उल्लेख करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “शिवसेना नेहमी पहाटेच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शपथविधीवर टीका करते. अजित पवार हे पहाटे पहाटे गव्हर्नर बंगल्यावर मॉर्निंग वॉकसाठी आले होते काय?? त्यांच्याजवळ आमदार टिकले नाही म्हणून ते परत गेले. पवार साहेबांचा जर कोणी गेम केला असेल तर तो अजित पवारांनीच केला,” असं उत्तर निलेश राणे यांनी शिवसेनेला दिलं आहे.

 

News English Summary: Shiv Sena always criticizes the morning BJP NCP swearing in. Did Ajit Dada Pawar come to the Governor’s Bungalow early in the morning for a morning walk? They went back as they did not have MLAs. If anyone played Pawar Saheb’s game, it was Ajit Dada Pawar said former MP Nilesh Rane.

News English Title: Former MP Nilesh Rane criticized Shivsena over Mahavikas aghadi politics Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x