22 November 2024 12:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अनिल स्पॉट नाना म्हणतो मला नोटीस आली नाही | नोटीस जागा मालकाला येते हडपणाऱ्याला नाही

Former MP Nilesh Rane, Minister Anil Parab, Mhada Land issue, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : शिवसेना नेते अनिल परब यांनी वांद्र्यात म्हाडाची जागा बळकावून कार्यालय उभारल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी महापौर किशोरी पेडणेकर आणि अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले.

सोमय्या यांनी म्हटले की, मी आज अनिल परब यांच्या वांद्र्यातील कार्यालयाला भेट दिली. म्हाडाच्या दोन इमारतींमधील मधल्या जागेत त्यांनी कार्यालय थाटले आहे. विलास शेगले हे या अनधिकृत बांधकामाबाबत संघर्ष करत आहेत. २७ जून २०१९ रोजी म्हाडाने अनिल परब यांना नोटीस बजावली होती. मग सरकार अनिल परब यांना वेगळा न्याय का लावत आहे, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला होता.

दरम्यान, याच विषयाला अनुसरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना लक्ष केलं आहे. याबाबत ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “बळजबरीने जागा बळकावल्यानंतर अनिल स्पॉट नाना परब म्हणतो की मला नोटीस आली नाही. नोटीस जागा मालकाला येते हडपणाऱ्याला नाही. व्यवस्थित माहिती काढली तर कळेल 70 टक्के शिवसेना शाखा अनधिकृत असतील… त्या पण पाडा.

अनधिकृत बांधकाम केले प्रकरणी अनिल परब यांच्या विरुद्ध नोटीस आणि तक्रार

 

News English Summary: BJP leader Kirit Somaiya had alleged that Shiv Sena leader Anil Parab had grabbed MHADA’s seat in Bandra and set up an office. He was speaking at a press conference in Mumbai on Friday. Kirit Somaiya made serious allegations against Mayor Kishori Pednekar and Anil Parab.

News English Title: Former MP Nilesh Rane has slammed Minister Anil Parab over Mhada Land issue Marathi News LIVE latest updates.

 

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x