22 November 2024 9:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

गृहमंत्र्यांविरोधातील आरोपसंबंधी दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Former Mumbai CP Parambir Singh, petition, Home minister Anil Deshmukh, high court

मुंबई, ३० मार्च: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा पडली होती. सदर प्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी याचिका मागे घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आपल्या याचिकेमध्ये परमबीर सिंहांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा आरोप लावत या प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली होती. याचिकेमध्ये सिंहांनी होमगार्ड डिपार्टमेंटसाठी आपल्या ट्रान्सफरलाही आव्हान दिले होते. राज्य सरकारचा हा आदेश बेकायदेशीर आणि मनमानी असल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

दरम्यान आज महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटीच्या आरोपसंबंधी दाखल केलेल्या दोन याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यामध्ये एक जनहित याचिका असून ती मुबंई येथील वकील डॉ. जयश्री पाटील हीने दाखल केली आहे. दुसरी याचिका मुबंईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली असून त्यामध्ये गृहमंत्र्यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज मुंबई येथे दुपारी बारा वाजता उच्च न्यायालयात दोन्ही याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी रुपये वसूली करण्याचे आरोप केले आहे. त्यासोबतच पोलिस विभागातील पदोन्नतीमध्ये होत असलेल्या भष्ट्राचारासंबंधीदेखील काही मुद्दे उपस्थित केले आहे. परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, गृहमंत्री देशमुख यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यापूर्वी त्याला जतन करण्याचे आवाहान केले आहे. यापूर्वी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका आधी उच्च न्यायालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परमबीर सिंह यांनी आपली याचिका मुबंई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

 

News English Summary: Former Mumbai Police Commissioner Parambir Singh, who had moved the Supreme Court against Home Minister Anil Deshmukh’s misconduct, was disappointed. While asking why you did not go to the Mumbai High Court in this case, the Supreme Court had advised Singh to go to the High Court first. He then withdrew the petition and rushed to the Mumbai High Court.

News English Title: Former Mumbai CP Parambir Singh petition against home minister Anil Deshmukh hearing at high court news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(168)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x