22 December 2024 5:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

केजे एनसीबी'च्या ताब्यात | रियासहित बॉलीवूडमधील मोठे मासे अडचणीत येणार

Found Rhea, Sushant Singh Rajput, Marathi News ABP Maza

मुंबई, १२ सप्टेंबर : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन पुढे आल्यानंतर सुशांतची गर्लफ्रेण्ड अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर रियाच्या तपासात या प्रकरणात अनेक महत्त्वाचे धागेदोरे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती लागले असून त्याआधारे आज आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक बडा मासा एनसीबीच्या गळाला लागला आहे.

एनसीबीने धडक कारवाई करत करनजीत नावाच्या व्यक्तीला अटक केली असून ड्रग्जच्या विश्वात तो ‘केजे’ या नावाने प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. करनजीत हा कॅपरी आणि लिटिल हाइट्स हे ड्रग्ज सप्लाय करायचा अशी माहिती हाती आली आहे. सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शनमध्ये करनजीत हा महत्त्वाचा दुवा असल्याचे पुरावे हाती लागत आहेत. करनजीत सॅम्युअल मिरांडा आणि रियाचा भाऊ शौविक चक्रवर्तीला ड्रग्ज सप्लाय करायचा आणि त्यांच्यामार्फत ड्रग्ज रिया आणि सुशांतपर्यंत पोहचतं व्हायचं असंही, एनसीबीच्या तपासात पुढे आलं आहे.

रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबत बॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. साराला समन्स बजावून पुढील आठवड्यात कार्यालयात बोलावून चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्य म्हणजे अनुज केशवानीनेही साराचं नाव घेतलं आहे. साराला गांजा पुरवल्याचे अनुजने तपासात सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सारा व बॉलिवूडमधील आणखीही काही जण अनुजच्या संपर्कात होते, असे स्पष्ट होत आहे.

 

News English Summary: In its ongoing probe into the drug angle to Bollywood actor Sushant Singh Rajput’s death, the Narcotics Control Bureau (NCB) on Saturday arrested one more person from Bandra, Karanjeet alias KJ. According to NCB officials, Karanjeet was allegedly part of the drug syndicate which it had busted as part of the investigation. Sameer Wankhede, joint director of NCB, confirmed the arrest.

News English Title: Found Rhea and Sushant Singh Rajput drug supplier KJ another big fish caught NCB net Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x