5 November 2024 1:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

श्वसनासंबंधी २० आजारांसाठी मोफत उपचार | शुल्क आकारल्यास हॉस्पिटलला पाचपट दंड

Free treatment, Mahatma Jotiba Fule, health Scheme, health minister Rajesh Tope

मुंबई, १८ ऑगस्ट : महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

उपचारासाठी पैसे घेतले तर ५ पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार होणार आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली. या बैठकीतगणेशोत्सव, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावर चर्चा झाली.

सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे, आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुकीवर मर्यादा हवी, सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत त्याची माहिती गणेशोत्सव मंडळानी द्यावी, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव मंडळांनी सॅनिटायझ करायला हवं. मोहरमही सर्व नियम पाळून केला पाहिजे.

 

News English Summary: The government has issued special orders regarding Mahatma Jyotiba Phule Janarogya Yojana. Hospitals have been instructed to provide free treatment for 20 respiratory ailments, Health Minister Rajesh Tope said.

News English Title: Free treatment in Mahatma Jotiba Fule health Scheme health minister Rajesh Tope News Latest updates.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x