19 January 2025 5:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या - IPO Watch BEL Share Price | डिफेन्स कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज बुलिश - NSE: BEL Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला तुफान गर्दी, 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट हिट, श्रीमंत करणार हा शेअर - Penny Stocks 2025 SBI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपये SIP वर मिळेल 1.26 कोटी रुपये परतावा IREDA Share Price | आता नाही थांबणार, इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IREDA Honda Dio Vs TVS Jupiter 110 | होंडा Dio की TVS ज्युपिटर 110 पैकी कोणती स्कूटर बेस्ट आहे, फीचर्स व किंमती जाणून घ्या
x

बाप्पा पावला महाराष्ट्र सैनिक मदतीला धावला | बसने कोकणात तर विशेष ट्रेनचा मार्ग मोकळा

Ganeshotsav 2020, MNS bus service, Konkan peoples

मुंबई , ८ ऑगस्ट : कोकणातील गणेशभक्तांना गावाकडे जाण्यासाठी राज्य सरकार कोणतीही सुविधा उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत बससेवा सुरू करण्याची घोषणा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला शब्द पाळला आहे. चाकरमान्यांसाठी मनसेची गणपती स्पेशल बस सेवा आजपासून सुरू झाली आहे.

करोनाचे संकट आणि त्याबाबतच्या नियमावलीमुळं यंदा गावाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांची मोठी कोंडी झाली होती. विशेषत: रेल्वे व एसटी बस सेवा बंद असल्यामुळं कोकणातील चाकरमान्यांना गावी पोहोचणे कठीण झाले होते. राज्य सरकारही याबाबत तातडीने काही निर्णय घेत नसल्यानं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने कोकणात जाण्यासाठी बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी बुकिंगची तारीखही जाहीर केली होती. त्यानुसार, १ ऑगस्टपासून बुकिंग सुरू करण्यात आलं होतं. त्यानुसार आज बस सोडण्यात आल्या.

मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह निवडक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. गाडीत प्रवेश करण्यापूर्वी सर्व प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळूनच हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मनसेच्या वतीनं प्रवाशांना सेफ्टी किटही देण्यात आलं आहे. यात मास्क, हातमोजे, सॅनिटायझर व बेडशीटचा समावेश आहे.

दुसरीकडे, कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोईसाठी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. 26 जुलै रोजी मनसे आमदार राजू पाटील यांनी पत्रव्यवहार करत तसेच ट्विट करत कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली होती.आता ही मागणी मान्य झाली असून आपल्या कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

26 जुलै रोजी मनसे आमदार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहले होते आणि ट्विट केले होते.आपल्या पत्रात त्यांनी कोकणवासीयांना गणेशोत्सवासाठी योग्य ती खबरदारी घेऊन रेल्वे सेवा सुरू करून दिलासा द्यावा अशी मागणी केली होती.तसेच त्यांनी पत्रात म्हंटले होते की कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात पारंपारीक पद्धतीने साजरा केला जातो. मुंबई, ठाणे,पालघर,नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातून लाखो कोकणवासी गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी जाऊन उत्साहात सण साजरा करतात. दरवर्षी रेल्वे व राज्य परिवहन सेवा सुरू असल्याने त्यांना गावी जाण्यासाठी कोणतीही अडचण येत नव्हती. यावर्षी कोरोना (COVID-19) विषाणूचे संकट संपूर्ण देशासह राज्यावर आले आहे.

 

News English Summary: MNS general secretary Sandeep Deshpande had a few days ago announced to start bus service to Konkan on behalf of MNS. The booking date was also announced. Accordingly, the booking was started from August 1. Accordingly, the buses were released today.

News English Title: Ganeshotsav 2020 MNS bus service for Konkan people started today News latest Updates.

हॅशटॅग्स

MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x