21 April 2025 7:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

गॅस गळतीच्या शक्यतेने मुंबईत भीतीचे वातावरण; आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Mumbai, Gas Leak Report, Gas Leak, Fire, Blast, Explosion, Fire Brigade, Mumbai Police

मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील बहुतांश भागात गॅसची दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांमध्ये मोठी घबराट उडाली होती..मानखुर्द, चेंबूर, घाटकोपर, पवई, हिरानंदानी, चकाला अशा विविध भागातून अग्निशमन दलाकडे तक्रारी आल्या..तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली तर चेंबूरमध्ये असलेल्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर असल्यानं मनपा अधिकाऱ्यांनी तेथे पाहणी केली.. मात्र ही गॅस गळती नेमकी कुठे झाली याचा अद्याप शोध लागलेला नाही.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विविध भागात गॅसची दुर्गंधी येत असल्याची शंका बऱ्याच स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर उपस्थित केली. काही रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना संपर्कही साधला. या तक्रारींची दखल घेत अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या. दरम्यान, या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिकेने इतर केमिकल कंपन्यांना सतर्कतेचा इशारा दिला. ‘देवनार, मानखुर्द, चेंबूर, विक्रोळी, दिंडोशी, विले पार्ले, कांदिवली, दहिसर भागात सध्या अग्निशमन दलाच्या ९ गाड्या रवाना झाल्या असून गॅस गळती नेमकी कुठे झाली आहे याचा तपास सुरू आहे’ अशी माहिती महापालिकेने दिली.

मुंबईत गॅस गळतीच्या, गॅसचा वास येत असल्याचा तक्रारी रात्री नागरिक करत होते. पोलीस,अग्निशमन दल तसेच विविध गॅस कंपन्यांचे अधिकारी तपास करीत होते पण कुठेही काहीही आढळल नाही.पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणाहून गॅस गळतीच्या तक्रारी आल्याने अग्निशमन दलाने अनेक ठिकाणी गाड्या पाठवल्या. तसेच अन्य यंत्रणांना देखील अलर्ट केले. गॅस गळतीच्या वृत्तामुळे नागरिकांमध्ये भीतीचे देखील वातावरण निर्माण झाले होते. पण तपासानंतर कुठेही गळती झाली नसल्याचे समोर आले आहे. गळतीचे वृत्त नसले तरी अग्निशमन दल आणि पोलिस अलर्ट आहेत.

गुरुवारी संध्याकाळपासून गॅस दुर्गंधीची तक्रार आमच्याकडे करण्यात करण्यात आली होती. या तक्रारी मुंबईच्या अनेक भागातून येत होत्या असे महानगर गॅस लिमिटेडने सांगितले. तक्रारीनंतर संबंधीत पथकांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. दरम्यान, गॅसच्या पाईपलाईनमध्ये गळती नसल्याचे महानगर गॅसने स्पष्ट केले आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या