15 January 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

भाजप-सेनेच्या सरकारमुळे गिरगांवकर रस्त्यावर: मेट्रो-रेल्वे प्रकल्प

गिरगाव : मुंबईतील मेट्रो रेल्वेचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु असून त्याला सुरवातीला गिरगावकरांचे सहकार्य लाभले होते. कारण या मार्गातील केवळ २ इमारती पाडाव्या लागतील असं आधी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आलं होत. परंतु भाजप-सेनेच्या सरकारने अक्षरशः त्या विषयावर यू-टर्न घेतल्याचे चित्र समोर आले आहे.

कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून २ इमारती नाही तर तब्बल ४० इमारती भुईसपाट केल्या जाणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे स्थानिक गिरगावकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. भाजप-शिवसनेच्या सरकारने आम्हाला विस्थापित करण्यापेक्षा आमच्या कुटुंबाला स्वेच्छामरण द्यावे अशी मागणी त्यांनी भाजप – शिवसेनेच्या युती सरकारकडे केली आहे.

भाजप शिवसेनेच्या युती सरकारने म्हणजे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून मागील ८ दिवसात गिरगावच्या तब्बल ४० इमारतींमधील रहिवाशांना त्यांच्या राहत्या इमारती रिकाम्या करण्याच्या नोटीस मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून धाडण्यात आल्या आहेत. त्या नोटीस मिळाल्यापासून सर्वच रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लवकरच आपण राहत असलेल्या इमारती तुटणार या धास्तीनेच गिरगावकर सुन्न झाले आहेत.

भाजप शिवसनेच्या युती सरकारकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने अखेर गिरगावकरांनी रविवारी ‘आम्ही गिरगावकर’ या व्यासपीठाच्या माध्यमातून आंदोलन करत स्थानिकांनी थेट स्वेच्छामरणाची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. आमचं आणि आमच्या कुटुंबाचं नेमकं भवितव्य काय याचा आम्हाला अंदाज येत नसल्याची भावना आम्ही गिरगावकरचे सचिव मिलिंद वेदपाठक यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे या स्थानिकांना भेटच देत नाहीत अशी खंत बोलून दाखविली आहे.

गिरगावातील सूर्यमहल, तारामहल, धूतपापेश्वर, क्रांतीनगर या परिसरातील नागरिकांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून या नोटीस बजावण्यात आल्या असून त्यात तब्बल १०३ कुटुंबांचा समावेश आहे. गिरगावातील सूर्यमहल व तारामहलमधील नागरिकांना पिंपळवाडी येथे म्हाडाच्या कॉलनीत पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु हेच उत्तर इतर ४० इमारतींमधील नागरिकांनाही देण्यात येत असल्याने स्थानिक नागरिकांच्या आणि कुटुंबियांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे शिवसेना निवडणूक आल्या की लगेच मराठीच अस्त्र बाहेर काढून गिरणगावात मतांचा जोगवा मागताना दिसते. परंतु आज त्यांच्याच राजवटीत म्हणजे दिल्लीत, राज्यात आणि महानगर पालिकेत सत्तेत असताना सुद्धा गिरगाव मधील मराठी माणसाला बेघर होण्याची वेळ आली आहे अशी खंत स्थानिक मराठी माणूस बोलून दाखवत आहे. कारण शिवसेना अशा विषयात केवळ निषेध करते, पण निर्णय काहीच हाती लागत नसल्याने स्थानिक संतप्त आहेत. त्यामुळे भाजप बरोबर शिवसेनेला सुद्धा येत्या निवडणुकीत गिरगावातील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ लागेल.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x