24 November 2024 5:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

भाजपाला सत्तास्थापनेच राज्यपालांकडून निमंत्रण

BJP Maharashtra, Shivsena

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटणार असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. याचबरोबर राज्यपालांनी फडणवीस यांना ११ नोव्हेंबरपर्यंत (सोमवार) बहुमत सिद्ध करण्यासही सांगितलं आहे. या अगोदर फडणवीस यांनी राज्यात भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता.

भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याने त्यांना पहिली संधी मिळाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. भाजपाने यापूर्वी स्पष्ट बहुमत नसतानाही अनेक राज्यांमध्ये सत्तास्थापनेसाठी दावा केलेला होता, असा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला. तसेच गेल्या १५ दिवसांत भारतीय जनता पक्षाने सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट आणि टोकाचे वार केले. लोकसभा निवडणुकीवेळी भारतीय जनता पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून देत उद्धव यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शहा आणि कंपनी खोटे बोलत आहे आणि खोटारड्यांशी मी मैत्री ठेवत नाही, असे उद्धव म्हणाले. या संघर्षाचा अद्याप शेवट झालेला नसला व युती तुटलेली नसली तरी हे दोन्ही पक्ष लगेचच एकत्र येतील अशी सुतराम शक्यता नाही. या स्थितीत राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापनेचं आमंत्रण दिल्याने पुढे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x