26 December 2024 12:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

NRC केवळ मुस्लिम नव्हे तर हिंदुंच्याही मुळावर घाव घालणारा कायदा : मुख्यमंत्री

CM Uddhav Thackeray, NRC, Hindu Muslim

मुंबई:  ‘जिथे भारतीय जनता पक्षाची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगेधोपे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचे याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का’, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्त्वावर जोरदार प्रहार केले. हे हिंदुत्व नसेल तर मी कुणापासून फारकत घेतली. हे माझे समविचारी आहेत काय? धर्माची होळी पेटवून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. हे हिंदुराष्ट्र मी मानणार नाही.

माझं हिंदु राष्ट्र, हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. माझ्या वडिलांनी शिकवलेलं हे हिंदुत्व नाही. माणसं माणसाला मारतील हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाविषयी गैरसमज पसरवून किंवा दुरुपयोग करून सत्ता मिळवणं हे माझं हिंदुत्व नाही, असे टोल्यावर टोले हाणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘हिंदुत्वावर’ जहाल टीका केलीय.

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदवही (एनआरसी) हा कायदा केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. त्यामुळे जर भाजपानं हा कायदा अंमलात आणायचा ठरवलं तर त्यामध्ये केवळ मुसलमानच नाही तर हिंदूही भरडले जातील. सर्वच धर्मांतील लोकांना याचा त्रास होईल. हा धर्मनिरपेक्षतेवर घाला घालणारा कायदा आहे. मी मुख्यमंत्री असलो आणि नसलो तरी माझं धोरणं स्वच्छ आहे की मी एनआरसी होऊ देणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

सत्तेमध्ये एकत्र आहात. सत्तेसाठी एकत्र राहाल…पण ही महाविकास आघाडी भविष्यातसुद्धा पुढे जाईल का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “जायला काय हरकत आहे? आणि न जावं असं कारण काय? जर तिघांनी एकमेकांच्या मर्यादा ओळखल्या असतील आणि तशा त्या ओळखल्या आहेतच, तर आपल्या मर्यादेमध्ये जास्तीत जास्त टप्पा किंवा दरमजल सहज साध्य करू शकतो. पण एखादा आपल्या आवाक्याच्या बाहेरचं काही करायला गेला तर तो आपटतो असं देखील ते म्हणाले.

NRC आणि CAAवरून देशभर सध्या वादळ सुरु आहे. अनेक राज्यांनी या कायद्याविरोधात ठरावही मंजूर केलेत. त्यामुळे महाराष्ट्र काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. देशभर वातावरण तापलेलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, NRC आणि CAA हे वेगळे विषय आहेत. NRCचं अजुन काहीच नाहीये. गृहमंत्री अमित शहांनी हे येणार नाही असंच सांगितलंय. पण NRC आलाच तरीही आम्ही तो महाराष्ट्रात येवू देणार नाही. NRC हा हिंदुच्याही मुळावर येणार आहे हे लक्षात ठेवा. सगळ्यांनाच आपलं नागरीकत्व सिद्ध करावं लागणार आहे. तर CAA हा कुणाचं नागरीकत्व हिरावून घेणारा कायदा नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शेजारी देशातून जे शरणार्थी आलेले आहेत त्यांना नागरीकत्व देणारा हा कायदा आहे.

 

Web Title:  Hindus will also suffer in NRC therefore this law will not be implemented says CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x