23 December 2024 12:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

अजून किती दिवस ट्रेन बंद राहणार | उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

Local train services, Bombay High Court, Maharashtra government, Marathi News ABP Maza

मुंबई, १० सप्टेंबर : राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत लोकल सेवा सुरु करण्याबाबत विचारणा केली आहे. अजून किती दिवस लोकल बंद राहणार, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. त्याचवेळी कोरोनासोबत जगावं लागणार आहे, असे सांगत न्यायालयाने म्हटले आहे, ६ महिने झाले, अजून किती दिवस लोकल बंद राहणार, अशी विचारणा केली आहे. दरम्यान, लोकल सुरू करण्याबाबत मागणी होत आहे.

मुंबईतील लोकल सेवा किती काळासाठी बंद असणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी कोविड-१९ या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर येथील उपनगरीय रेल्वे सेवा प्रतिबंधित करण्याच्या किती काळासाठी योजना आहे याबद्दल महाराष्ट्र सरकारला विचारले. वकिलांना मुंबई शहरातील लोकल गाड्या सुरु करण्याची मागणी केली आहे. लोकल सेवेला परवानगी मिळावी या मागणीसाठी न्यायालय याचिका केली आहे. या संबंधित याचिकेवर सुनावणी सुरु झाली आहे. त्यावेळी उच्च न्यायालयाने ही विचारणा केली आहे.

दुसरीकडे, टाळेबंदी शिथिल होताच आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेने परराज्यातून येणाऱ्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जून ते ऑगस्टपर्यंत तीन महिन्यात सुमारे २५ लाख प्रवासी विशेष रेल्वे गाडय़ांमधून मुंबई महानगरात परतल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून मिळाली. मध्य रेल्वेवरुन सर्वाधिक १६ लाख प्रवासी आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टाळेबंदी लागताच उत्पन्न नसल्याने अनेक कामगार, मजूर आपल्या कुटुंबीयांसह परराज्यात रवाना झाले. त्यासाठी विशेष श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई व परिसरातून सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या अधिक होती. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने जून महिन्यापासून सामान्य प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाडय़ा चालवण्यास सुरुवात के ली आणि श्रमिक गाडय़ांचे प्रमाण हळूहळू कमी होत गेले. त्यावेळी परराज्यात जाणाऱ्यांची संख्याही लाखोंच्या घरातच होती. परंतु जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिल होण्यास सुरुवात झाली आणि आपले बिघडलेले अर्थचक्र पुन्हा सुरळीत करण्यासाठी परराज्यात गेलेला मजूर, कामगार पुन्हा मुंबई महानगराकडे येऊ लागला आहे.

 

News English Summary: The state government has been asked by the Mumbai High Court to start local services in Mumbai. The Mumbai High Court has asked the state government how many more days the local will remain closed. At the same time, he will have to live with Corona, the court said, adding that it has been 6 months and how many more days the local will be closed.

News English Title: How long will local train services be restricted Mumbai High Court asks Maharashtra government Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x