5 January 2025 12:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Mumbai Local | मुंबई ट्रेनच्या प्रवासासाठी असा मिळवा ऑफलाईन पास

Mumbai Train

मुंबई, १० ऑगस्ट | 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास मासिक पास मिळू शकणार आहे. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्ही सेवा उपलब्ध आहे. ११ ऑगस्टपासून म्हणजेच उद्यापासून उपनगरीय रेल्वे स्थानकांवर ऑफलाईन मासिक रेल्वे पास प्रक्रिया आणि कोव्हिड लसीकरण ऑफलाईन पडताळणी सुरू केली जाणार आहे. अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

काय आहेत या प्रक्रियेच्या अटी?
* नागरिकांनी पडताळणीसाठी येताना कोव्हिड लसीकरणाचा दुसरा डोस घेऊन 14 दिवस झाल्याचे प्रमाणपत्र आणि छायाचित्र ओळखपत्र पुरावा म्हणून आणणे आवश्यक

* पडताळणीमध्ये पात्र ठरलेल्यांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवासाची मुभा

* मुंबई महापालिका क्षेत्रातील ५३ रेल्वे स्थानकांवर 358 मदत कक्ष उभारले जाणार

* मुंबई महापालिका क्षेत्रात 109 स्थानकांवर मदत कक्ष

* सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत दोन सत्रांमध्ये कार्यरत राहणार मदत कक्ष

* घराजवळच्या स्थानकांवर पडताळणीसाठी जावं मात्र विनाकारण गर्दी करू नये

* कोव्हिड लसीकरणाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचं आढळल्यास कठोर पोलीस कारवाई केली जाणार

मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांना 15 ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यास मुभा देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 ऑगस्टच्या रविवारी केली. त्या अनुषंगाने ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ऑफलाईन पडताळणी आणि पास उपलब्ध करण्याची सुरूवात उद्यापासून केली जाते आहे अशी माहिती इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to apply for train travel pass offline in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#MumbaiLocalTrain(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x