23 January 2025 10:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

घटनेची चौकशी करा; घटनांवर पडदा टाकण्यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात: डॉ. नीलम गोरे

MLA Neelam Gore, Prakash Ambedkar

हैदराबाद: हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आलं आहे. पोलीस एन्काऊंटरमध्ये चारही आरोपी ठार झाले आहेत. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

चारही आरोपी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत होते. ४ डिसेंबर रोजी या खटल्यात लवकरात लवकर सुनावणी व्हावी यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापनाही केली होती. शिवा, नवीन, केशवुलू आणि मोहम्मद आरीफ असं चारही आरोपींची नावं आहेत. दरम्यान, राजकीय क्षेत्रातून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. सदर एन्काऊंटरमुळे फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, पोलिसांच्या ताब्यात असताना असं एन्काऊंटर होतं त्यावेळी पोलीस यंत्रणेबद्दल शंका येते, यातील मुख्य सूत्रधार समोर येत नाही, एन्काऊंटर केले की घडवले याची चौकशी करावी. सीआयडी अथवा सीबीआय चौकशी झाली पाहिजे. अशामार्गाने पुरावे नष्ट केले जातात. चौकशी होत नाही. आरोपी खरे होते की नाही येथून ही सुरुवात होते. घडलेल्या घटनांवर पडदा पडावा यासाठी पोलीस काही लोकांना अटक करतात. जर ते खरोच आरोपी होते तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली असती, पण या घटनेची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

तसेच हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर अयोग्य व कायद्याला धरून नव्हतं,’ असं स्पष्ट मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केलं आहे. ‘झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे. पण तसा न्याय चंबळचे दरोडेखोरही द्यायचे. पण शेवटी ते दरोडेखोरच होते,’ असंही निकम यांनी सांगितलं.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशाला हदरवून टाकणारं हैदराबाद सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा खात्मा पोलिसांनी केला आहे. ज्या ठिकाणी आरोपींनी पीडित तरुणीवर बलात्कार केला होता. त्याचठिकाणी पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला आहे. पोलीस तपासावेळी हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही घटना घडली.

दरम्यान, माझ्या मुलीचा मृत्यू होऊन १० दिवसांचा काळ लोटला आहे. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, अशा शब्दात प्रतिक्रिया देत त्यांनी या एन्काउंटरबाबत तेलंगण सरकारचे अभिनंदन केले आहे. तर, हे आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले हे ऐकून मला अतिशय आनंद झाल्याचे बलात्काराची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरच्या बहिणीने म्हटले आहे.

हे चार आरोपी अशा प्रकारे एन्काउंटरमध्ये ठार झाल्याने हे एक उदाहरण म्हणून कायम राहील. अतिशय रेकॉर्ड वेळेत आम्हाला न्याय मिळाला आहे, असे म्हणत या बहिणीने त्यांच्या कुटुंबाला कठीण काळात साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x