22 January 2025 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025
x

हवाच काढली? | एका सब इन्स्पेक्टरमुळे राज्य सरकारवर परिणाम होईल असं मला वाटत नाही

Sachin Pawar, Sachin Vaze

नवी दिल्ली, १६ मार्च: सचिन वाझेप्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच थेट भाष्य केलं आहे. एका इन्स्पेक्टरचा राज्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही, असं सांगत शरद पवार यांनी ठाकरे सरकारला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळाच आज दिला.

राज्यातलं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे का? असा प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीही अडचण नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सर्व सहकारी व्यवस्थित काम करत आहेत. काही समस्या येतात, त्या सोडवल्या जातील.” दरम्यान, सचिन वाझे प्रकरणावरून विरोधी पक्ष टार्गेट करत असताना तो मुद्दा शरद पवारांनी फेटाळून लावला. “एका सब इन्स्पेक्टरचा परिणाम संपूर्ण सरकारवर होईल असं मला वाटत नाही.

तसेच या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत असतील तर आपलं कर्तव्य आहे की त्यांना सहकार्य करणं. ज्या लोकांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आहे, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी या राष्ट्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत”, असं ते म्हणाले.

 

News English Summary: For the first time, NCP President Sharad Pawar has directly commented on the Sachin Vaze case. “I don’t think an inspector will have any effect on the state,” Sharad Pawar said, adding that there was no threat to the Thackeray government.

News English Title: I do not think an inspector will have any effect on the state Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x