23 February 2025 3:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

एकोपा नसल्याने हे महाविकास आघाडी सरकार फार काळ टिकणार नाही - राज ठाकरे

Raj Thackeray, MahaVikas Aghadi

मुंबई, ३१ जुलै : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत आलं. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच राज्याला कोरोनाने विळखा घातला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. अशातच आता या जीवघेण्या कोरोना व्हायरसमधून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सरकारचं व्हिजन काय आहे? त्याचबरोबर कोरोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिणामांचा सरकार कसा सामना करणार आहे? तसेच सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पहिल्या सत्रात राज ठाकरे यांनी आपलं व्हिजन मांडलं आणि त्यात राज ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

दरम्यान महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही, असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. “लॉकडाउन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा,” असंही ते म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या सरकारच्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. त्या सरकारमध्ये एकमेकांना विचारलं जात नाही. त्यामुळे ते सरकार फार काळ टिकणार नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. “मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही,” असं ते यावेळी म्हणाले.

 

News English Summary: I do not think the Mahavikas Aghadi government will last long. MNS chief Raj Thackeray said that a government which does not have unity and does not ask each other will not last long.

News English Title: I do not think the Mahavikas Aghadi government will last long said Raj Thackeray News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x