22 January 2025 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

सुशांत प्रकरणी केंद्राला वाटत असेल तर त्यांनी CBI चौकशी करावी | काँग्रेसकडून धक्का?

central government, CBI, Sushant Singh Rajput case, Minister Aslam Shaikh, Aaditya Thackeray

मुंबई, १८ ऑगस्ट : सुशांतसिंग राजपूत या अभिनेत्याच्या आत्महत्येबाबत सुरू असलेल्या पोलीस तपासाबद्दल राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व या सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख हे समाधान व्यक्त करीत असताना अचानक पार्थ यांनी विरोधी भाजपच्या मागणीत सूर मिसळत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्यानंतर राज्यात मोठं वादळ निर्माण झालं होतं. मात्र आता तशीच अप्रत्यक्ष मागणी काँग्रेसच्या मंत्र्याने केल्याने पुन्हा वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात केंद्राला सीबीआय चौकशी करायची असेल तर करावी असं वक्तव्य राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याने केले आहे. त्यामुळे सीबीआय चौकशीवरुन राज्य सरकारच्या महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी सीबीआय चौकशीला पाठिंबा दिल्याचं त्यांच्या विधानावरुन दिसत आहे.

या प्रकरणी मंत्री अस्लम शेख म्हणाले की, सुशांत प्रकरण मुंबई पोलीस चांगल्यारितीने तपास करत आहे. पण केंद्राला वाटत असेल यामध्ये आणखी तपासाची गरज आहे तर त्यांनी चौकशी करावी. ही घटना मुंबईत घडली आहे. काही लोकांनी या प्रकरणात मीडियात नावं यावी यासाठी विधाने करत आहे. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद आहे त्यामुळे या वादात काहीतरी बोलून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांनी तपास केला आहे तरी केंद्राला वाटत असेल सीबीआय चौकशी करावी तर करु शकतात असं ते म्हणाले.

तसेच तपासाला ६० दिवस असो, १२० दिवस झाले, केंद्र सरकारला वाटत असेल तर त्यांनी चौकशी करावी असं मत अस्लम शेख यांनी मांडले आहे. सुप्रीम कोर्टात याबाबतचं प्रकरण असताना राज्य सरकार सीबीआयकडे हे प्रकरण सोपवू नये यासाठी विरोध करत आहे. अशा परिस्थितीत जर काँग्रेसमधील मंत्री सीबीआय चौकशीच्या मागणीला पाठिंबा देत असतील तर नक्कीच हे महत्त्वपूर्ण विधान आहे.

 

News English Summary: Minister Aslam Sheikh said that the Sushant Singh Rajput case is being investigated by the Mumbai Police. But if the Center thinks it needs further investigation, it should do so. He said that although the Mumbai Police has investigated, if the Center thinks that the CBI should investigate, it can do so.

News English Title: If central government wants CBI should investigate actor Sushant Singh Rajput case says minister Aslam Shaikh News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x