22 January 2025 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या
x

मुंबई महापालिका एल वॉर्डच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम? - सविस्तर वृत्त

Illegal construction, Saki Naka, Mumbai BMC L Ward, Mumbai Mayor

मुंबई, २८ सप्टेंबर : असल्फा येथे अनधिकृत आणि धोकादायक बांधकाम करणाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याबाबत महापालिकेने साकीनाका पोलिसांना लेखी पत्र देऊन तब्बल दोन वर्षे उलटली तरी अद्याप पोलीस त्याकडे डोळेझाक करीत कोणतीही कारवाई करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत या भागातील अनेक सोसायटींनी पाठपुरावा करूनही पोलीस दाद देत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. परेरावाडी, साईबाबा मंदिर समोर, पाईप लाईन, साकीनाका, मुंबई येथील अनधिकृत रित्या बांधण्यात आलेली आशीर्वाद धाम हौसिंग सोसायटी कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली आहे.

परेरावाडी येथे पाइपलाइन रोडवरील साईबाबा मंदिरासमोर अनधिकृत बांधकाम होत असल्याच्या तक्रारी दोन वर्षांपूर्वी करण्यात आल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. त्यावेळी याठिकाणी दुमजली बांधकामाच्या आत लोखंडी चॅनेल उभारण्यात आल्याचे निदर्शनास आले. अशा पद्धतीने बांधकाम करणे ही तांत्रिकदृष्ट्या अत्यंत चुकीची पद्धत असून या बांधकामामुळे आजूबाजूच्या उर्वरित बांधकामांना धोका निर्माण होण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांना आढळली.

त्यामुळे महापालिकेने २0 जुलै २0१८ रोजी काम थांबवण्याची अधिसूचना बांधकाम करणाऱ्यांना बजावली होती. मात्र तरीही बांधकाम थांबवण्यात न आल्याने ते बांधकाम आजूबाजूच्या बांधकामांवर कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याचा धोका निर्माण झाल्याने एल वॉर्डच्या सहायक आयुक्तांची परवानगी घेऊन हे बांधकाम करणाऱ्यांविरोधात योग्य कलमान्वये गुन्हा दाखल करावा, असे पत्र सहायक अभियंता (इमारत व कारखाने) यांनी ३१ जुलै २0१८ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ निरीक्षकांना दिले होते.

पोलिसांनी तेव्हापासून वेगवेगळी आणि न पटणारी कारणे देत महापालिकेच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची तक्रार या भागातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेने पोलिसांना दिलेल्या पत्रानंतर या भागातील शिवशक्ती को. ऑप. हाऊसिंग सोसायटीने महापालिका आणि साकीनाका पोलीस ठाण्याला दिले होते. त्याचप्रमाणे पितृस्मृती को- ऑप हाऊसिंग सोसायटीनेही महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून या इमारतीत भूमिगत तळघर बांधताना आजूबाजूच्या घरांना भेगा गेल्याचे निदर्शनास आणून तेथे सिलिंडरसारख्या ज्वालाग्राही वस्तूंचा साठा करण्यात आल्याने या धोकादायक प्रकाराबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याच परिसरात मध्यंतरी एका अनधिकृत बांधकामात गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटाने अनेकांचा मृत्यू झाला होता आणि त्याची झळ बाजूलाच असलेल्या शाळेला देखील लागल्याने अनेक निष्पाप मुलांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात कंगना रानौतच्या बांधकामावर हातोडा मारणाऱ्या महापालिकेच्या तत्पर यंत्रणेला मुंबई उच्च न्यायालयाने झापले होते. मात्र याच साकीनाक्यातील अनधिकृत बांधकामावरून स्थानिक जागृत लोकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार सतर्क करून देखील संबंधित तक्रारीकडे कानाडोळा होतं असल्याने लोकांना महापालिका एल वॉर्ड मधील अधिकाऱ्यांची आणि स्थानिक पोलीस प्रशासनाची मिलीभगत असल्याची शंका येऊ लागली आहे.

 

News English Summary: Two years after the Municipal Corporation of India (MCI) filed a written complaint with the Sakinaka police against the unauthorized and dangerous builders at Asalfa, it has been revealed that the police have not turned a blind eye to it. Residents are alleging that the police are not appreciating this despite following up by many societies in the area.

News English Title: Illegal construction at Saki Naka under Mumbai BMC L Ward Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BMC(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x