11 January 2025 3:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

विधानसभा : राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसे पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली

MNS, Raj Thackeray, Amit Thackeray, Maharashtra Assembly Election 2019, Maharashtra Navnirman Sena

मुंबई: विधानसभा निवडणूक २ दिवसांवर येऊन पोहोचली आहे आणि शिवसेना – भाजपने पक्षीय यात्रेतून संपूर्ण राज्य पिंजून काढलं आहे. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत नेमकं काय चाललं आहे तेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना समजेनासं झालं आहे. आज विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत महत्वाची बैठक पार पडली आहे.

दरम्यान, या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबतीत सविस्तर चर्चा झाली आहे. मात्र त्यातही दोन प्रवाह पाहायला मिळाल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यामध्ये काही नेत्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. मात्र काहींनी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि पैशावर होणारे दिग्गजांचे भाजप-सेनेतील पक्ष प्रवेश पाहता मनसेने निवडणूक लढवू नये, असं मत व्यक्त केल्याचे समजते.

त्यानंतर लवकरच राज ठाकरे निवडणुकीबद्दलची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करतील, अशी माहिती बैठकीनंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. मात्र पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं हे ते कार्यकर्त्यांना जराही कळू देत नसल्याने अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही जाहीर होऊ शकते, तरी मनसे निवडणूक लढविणार की नाही हे स्पष्ट होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाज माध्यमांवर उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत देखील शेवटपर्यंत काहीच कळू शकलं नव्हतं आणि अखेर लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घोषित केला आणि अनेकांचा हिरमोड झाला होता.

मात्र लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकदेखील न लढवल्यास आम्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं राजकीय भविष्य काय अशी कुजबुज आपसात रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र विधानसभा निवडणूक न लढविल्यास मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी कायमचे दूर जातील आणि २०२४ची स्वप्न दाखवून काहीही फरक पडणार नाही असं अनेकांनी मत व्यक्त केला आहे. मात्र मनसेने विधानसभा निवडणूक वाढविल्यास आपले मतदार आपल्या जवळ राहतील असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. सध्या काँग्रेस-राष्ट्रवादी अत्यंत दयनीय राजकीय पेचात असून, त्यांची हवा पूर्णपणे निघून गेली आहे आणि त्यांची पोकळी भरून काढण्याची मोठी संधी मनसेला चालून आली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मतदार जे भाजपाला मतदान करू इच्छित नाहीत ते मनसेकडे वर्ग होण्याची नामी संधी चालून आली आहे.

त्यामुळे मनसेने आगामी निवडणूक लढवावी आणि सध्याची राज्यातील मोठ्या विरोधकांची पोकळी भरून काढावी आणि सदर परिस्थिती सकारात्मक घेऊन संधीचं सोनं करावं असं कार्यकर्त्यांना वाटत आहे. भाजप-शिवसेना नेत्यांच्या सभांपेक्षा राज ठाकरे यांच्या सभांना आणि भाषणांना प्रसार माध्यमं उचलून धरणार याची कार्यकर्त्यांना जाण असून, त्याचा पक्षाने फायदा करून घ्यावा असं ठाम मत कार्यकर्ते नोंदवत आहेत. राज ठाकरे यांनी निवडणूक लढविल्यास आम्हाला मोठी स्फूर्ती मिळेल असं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राज ठाकरे नेमका कोणता निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x