21 November 2024 11:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आ. भातखलकरांचा पत्ता कट होणार? उत्तर भारतीय नेते रमेशसिंग ठाकूर यांना संधी?

BJP Mumbai, BJP Maharashtra, MLA Atul Bhatkhalkar, Former MLA Ramesh Singh Thakur, Maharashtra State Assembly Election 2019

मुंबई : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षांतर्गत स्पर्धा देखील वेगाने होऊ लागल्या आहेत आणि त्यात विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यासाठी अनेक नेते मंडळी सरसावल्याचे दिसत आहे. त्याचाच प्रत्यय सध्या कांदिवली मतदारसंघात पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर उत्तर भारतीय मतदार असल्याने काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार रमेशसिंग ठाकूर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तशा प्रकारच्या हालचाली इथल्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळत असून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांच्याविरुद्ध बंड पुकारलं जाऊ शकतं.

काँग्रेसमध्ये आमदार पद भूषविणारे रमेशसिंग ठाकूर २०१४ मधील निवडणुकीत पराभूत झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. स्वतः शिकलेले नसले तरी ते शिक्षण सम्राट आहेत हे नवल आणि अर्थशक्तीच्या बळावर विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांचा पत्ता कट होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. आजच्या घडीला या मतदारसंघात भाजपचे एकूण ७ नगरसेवक आहेत. मात्र हे सर्व नगरसेवक आमदार अतुल भातखालकरांवर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. त्यांच्या फटकळ आणि चिडून बोलण्याच्या स्वभावामुळे कार्यकर्ते देखील नाराज आहेत.

दरम्यान धारावीनंतरची सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या हनुमान नगरची एकत्रित विकास योजना अतुल भातखालकरांमुळेच रखडल्याचं स्थानिक रहिवासी सांगतात आणि त्यामुळे तब्बल १८ हजार कुटुंबाच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक मतदार देखील त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं समजतं. कांदिवली विधानसभा मतदारसंघात ३५ टक्के मराठी मतदार, गुजराती-मारवाडी-जैन २७ टक्के मतदार तर २४ टक्के उत्तर भारतीय मतदार आहेत. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास काँग्रेस-एनसीपी-मनसे उमेदवार देखील मोठी लढत देऊ शकतो असा हा मतदारसंघ आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x