पोस्टमन'ला घेरून प्रश्न विचारले | पण PoK शब्दावरून कंगनाला घेरायला विसरले - सविस्तर वृत्त
मुंबई, १० सप्टेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमकी दिल्याचा आरोप करताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यापासून अभिनेत्री कंगना रणौतवर टीकेची झोड उठली होती. यासोबतच मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्यानेही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर सोशल मीडियावर कंगनाला सेलिब्रेटींसह सर्वसामान्य मुंबईकरांनी कंगनाला ट्रोल केलं होतं.
यावेळी कंगनाला काही जणांनी मुंबईत पुन्हा येऊ नको अशा धमक्याही देण्यात आल्या. त्यांच्या या धमक्यांना उत्तर देताना कंगनाने आपण मुंबईत येणार असून कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं आव्हानच दिलं होतं. त्यानुसार कंगना बुधवारी दुपारी मुंबईत दाखल झाली. मात्र कंगना येणार म्हटल्यावर देशभरातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तिच्या कार्यालयाच्या ठिकाणी उपस्थित होते.
त्यावेळी भारतीय प्रसार माध्यमांमधील केविलवाणे प्रकार देखील पाहायला मिळाले. वास्तविक महापालिका जेव्हा कोणत्याही बांधकामावर हातोडा फिरवतं तेव्हा स्थानिक पोलिसांसोबत कागदोपत्री सुरक्षेच्या कारणावरून संरक्षण मागून घेतात आणि पालिका कर्मचाऱ्यांना संरक्षण देणं हेच पोलिसांचं त्यावेळी मुख्य कर्तव्य असतं. बांधकाम थांबवणं पोलिसांचं काम नसतं, तर ते पालिका आणि संबंधित वास्तूच्या मालकाने केलेल्या न्याय पालिकेत धाव घेऊन निर्णय घ्यायचा असतो. मात्र उपस्थित प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट पोलिसांना घेरून तुम्ही तोडकाम थांबवत का नाही असे संदर्भहीन प्रश्न केल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर प्रसार माध्यमांचे काही अतिउत्साही प्रतिनिधी तर पालिकेने आणलेल्या बुलडोझरवर चढले आणि चालकाला प्रश्न विचारू लागले आणि प्रथम तुमचं नाव काय असा प्रश केला. मात्र त्या बुलडोझर चालकाला संबंधित माध्यमांच्या प्रतिनिधी पेक्षा अधिक प्रगल्भता होती आणि म्हणून त्याने लगेच प्रक्रिया दिली की, “माझं नाव समजून तुम्ही नेमकं काय करणार” आणि चर्चा थांबवली. वास्तविक ते पालिका काँट्रॅक्टरचे कर्मचारी असतात आणि त्यांना कायदेशीर प्रक्रियेबाबत प्रश्न विचारून काय होणार होतं.
मात्र हद्द तर तेव्हा झाली जेव्हा प्रसार माध्यमांनी इमारतीजवळ खाकी गणवेशात आलेल्या पोस्टमनला काकांना घेरलं आणि त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत तुम्ही बांधकाम का तोडलं, तुम्ही बांधकाम का तोडलं अशा एकाच प्रश्नाचा मारा करून भांभावून सोडलं. विशेष म्हणजे संबंधित पोस्टमन काका वारंवार मी पोस्टमन आहे, मी पोस्टमन आहे असं सांगत असताना देखील माध्यमांना स्वतःच्याच गोंधळात त्यांचे शब्द कानावर पडत नव्हते. अखेर भेदरलेले पोस्टमन काका देखील पत्रं न देताच तिथून निघून गेले. मात्र जय PoK शब्दावरून वाद वाढला आणि वाढवला त्या कंगनाला “तू मुंबई शहराला PoK म्हणजे पाक व्याप्त काश्मीर” कसं बोलू शकतेस असा साधा एक प्रश्न सुद्धा विचारला नाही.
News English Summary: Amidst the chaos, they did something that will question the idea of the logic behind their reporting skills. A postman who was visiting the office for some work was swarmed by the media who started to ask why he demolished the office. They assumed him to be some BMC official and ganged up on him. He legit had to shout to clarify his identity.
News English Title: India Media were asked questions to Postman during Kangana Ranaut office demolition Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH