23 February 2025 9:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून राऊतांच्या निषेध | थेट राजीनाम्याची मागणी

Indian Medical Association, Letter To CM Uddhav Thackeray, Sanjay Raut, Statement against Doctors

मुंबई, १८ ऑगस्ट : ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ अशा वक्तव्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका होत आहे. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार आक्षेप घेत माफी मागावी अशी मागणी केली होती. मात्र संजय राऊत यांनी या प्रकरणावर आपल्या स्टाइलने खुलासा करत भाजपला फटकारून काढले होते.

‘डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीशा त्यांची मदत केली आहे. डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा भरमसाठ बिलं आली म्हणून आंदोलनं केली त्यावेळी मीच मध्यस्तीची भूमिका केली आणि डॉक्टरांची बाजू घेतली होती. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही’ असं राऊत यांनी स्पष्ट केले हॉट.

‘एका विशिष्ट राजकीय विचारांची लोकं मोहीम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये, माफी मागण्यास काही जण सांगत आहेत पण मी अपमानच कुणाचा केलेला नाही’ असंही राऊत यांनी ठामपणे सांगितले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध करण्यात आला असून राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ठाणे शाखेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे डॉक्टरांचं खच्चीकरण झालं असून त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे पत्रात:
संपूर्ण जग सध्या करोना संकटाचा सामना करत आहे याची तुम्हाला जाणीव आहेच. आरोग्य कर्मचारी फक्त आपला स्वत:चा नाही तर त्यांच्यावर अवलंबून असणारी मुलं, जोडीदार, आई-वडील यांचाही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. अशा कठीण परिस्थितीत सरकार आणि राजकारण्यांनी आमच्या बाजूने उभं राहावं अशी अपेक्षा आहे.

संजय राऊत यांनी कंपाऊंडरला डॉक्टरपेक्षा जास्त कळतं असं म्हटल्याने आम्ही अस्वस्थ आहोत. आम्ही त्यांच्या या वागण्याचा निषेध करत असून राजीनाम्याची मागणी करतो. अशा नकारात्मक आणि अपमानजनक वक्तव्यामुळे आम्ही डॉक्टर पूर्ण कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणे काम करु शकत नाही आहोत. सर्व डॉक्टरांच मनोधैर्य खच्चीकरण झालं असून तुम्ही योग्य ती कारवाई कराल अशी अपेक्षा आहे.

 

News English Summary: Shiv Sena MP Sanjay Raut’s statement has been condemned by the Indian Medical Association and demanded his resignation. A letter has been sent to Chief Minister Uddhav Thackeray from the Thane branch of the Indian Medical Association.

News English Title: Indian Medical Association Thane Branch Letter To Cm Uddhav Thackeray Over Sanjay Raut Statement News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x