5 November 2024 7:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु नये - सुप्रीम कोर्ट

Interim Protection to Parambir Singh

मुंबई, २२ नोव्हेंबर | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह देश सोडून पळून गेले असल्याचं वृत्त सिंह यांच्या वकिलांनी फेटाळून लावलं आहे. परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. सुनावणी अंती न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. मुंबई पोलीस आणि सीबीआयनं परमबीर सिंह यांना 6 डिसेंबरपर्यंत अटक करु (Interim Protection to Parambir Singh) नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

Interim Protection to Parambir Singh. He is out of Maharashtra as his life is in danger in Mumbai, lawyers told the Supreme Court today. Mumbai Police and CBI have ordered Parambir Singh not to be arrested till December 6 :

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे आणि सध्या गायब असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. मागील सुनावणी वेळी न्यायालयाने परमबीर सिंह कुठे आहेत, असा सवाल करत त्यांचा ठिकाणा विचारला होता. त्यावर वकिलांनी ते भारतातच असल्याचं सांगितलं.

परमबीर सिंह यांनी अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायालयाने त्यांच्याबद्दल माहिती विचारली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंह नेपाळमार्गे देशाबाहेर गेल्याची माहिती चुकीची असल्याचं सांगितलं.

माझ्याजवळ डीजीपींची ऑडिओ टेप आहे, ज्यामध्ये माजी गृहमंत्र्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यास सांगितलं आहे. ते मला धमकी सुद्धा देत आहेत. तक्रार आणि खटले मागे घेतले नाही, तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे”, असं परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सांगितलं.

परमबीर सिंह यांच्या जीवाला मुंबईत धोका आहे. त्यामुळे ते मुंबईपासून दूर आहेत. त्यामुळेच ते मुंबईत जात नाहीयेत”, असं वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलं. “हे आश्चर्यकारकच आहे की, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनाच मुंबईत यायची आणि राहायची भीती वाटते”, असं मत न्यायालयानं नोंदवलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Interim Protection to Parambir Singh till December 6 2021 granted by supreme court.

 

हॅशटॅग्स

#Supreme Court(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x