22 November 2024 5:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

JEE आणि NEET परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी

JEE NEET, Permitted To Travel, Special Trains

मुंबई, ३१ ऑगस्ट : कोरोना व्हायरसचं संकट आणखी गडद होत असतानाच JEE आणि NEET परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये काहीसं तणावाचं वातावरण असतानाच दिलासादायक बातमी आली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

रेल्वेच्या निर्णयानुसार पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये परीक्षार्थी विद्यार्थ्यांना प्रवास करण्यास सूट देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचं ऍडमिटकार्ड पाहून त्यांना रेल्वे स्टेशनवर येऊ दिलं जाईल. गर्दी टाळण्यासाठी परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीट काऊंटर सुरू केले जाणार आहेत.

विद्यार्थ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यासाठी परवानगी देताना अ‍ॅडमिट कार्ड तपासलं जाणार आहे. अ‍ॅडमिट कार्ड तपासल्यानंतरच विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पालकांना परीक्षेच्या दिवशी रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल. यासंबंधी रेल्वे स्थानकं आणि तिथे तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त काऊंटर सुरु केले जाणार आहेत.

परिपत्रकात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने विद्यार्थी वगळता इतरांना स्थानकांवर गर्दी करु नका असं आवाहन केलं आहे. तसंच विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान करोनाशी संबंधित सर्व सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे.

 

News English Summary: JEE and NEET exam dates were announced just as the corona virus crisis was getting darker. So while there is some tension among the students, there is good news. Students appearing for this exam are allowed to travel on Mumbai Local.

News English Title: JEE NEET Candidates Are Permitted To Travel In Special Suburban Services News Latest Updates.

हॅशटॅग्स

#NEET EXAM 2020(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x