कल्याण पत्रीपूल | चीन जेवढ्या वेळेत हायवे आणि धरणं उभारतं | पण शिवसेना...
कल्याण, २२ नोव्हेंबर: फेब्रुवारी २०२० पर्यंत कल्याणचा पत्रीपूल सुरू होणार, इतकंच नाही तर या पुलाच्या बाजूला आणखी एक नवा पूल उभारणार असल्याची पोश्टरबाजी शिवसेनेने २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत केली होती. म्हणजे कोरोनाची देशात कल्पनाही नसताना त्यापूर्वी पत्रीपूल पूर्ण होणार होता असं वचन शिवसेनेने दिलं होतं. खासदार श्रीकांत शिंदे आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली होती.
पूल जीर्ण झाल्याने नोव्हेंबर 2018 मध्ये हा पूल पाडण्यात आलेला. त्यानंतर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण-डोंबिवलीकरांना करावा लागला होता. त्या त्रासाचं मार्केटिंग करत शिवसेनेने तशीच होर्डिंगबाजी विधानसभा निवडणुकीत केली होती आणि त्याच होर्डिंगवर काम केव्हा पूर्ण करणार त्याची तारीखही जाहीर केली होती. म्हणजे जवळपास ९ महिने आधीच हा पूल पूर्ण होणे अपेक्षित असताना शिवसेनेने त्यासाठी इतका प्रचंड वेळ घेतला की त्यावेळेत चीन सारखा देश दोन हायवे आणि ३ धरणं बांधून पूर्ण करतो.
मात्र आता या पुलाचे गर्डर उभारण्याचं काम पूर्णत्वास आलं असून शिवसेनेकडून त्याचं असं काही मार्केटिंग सुरु आहे जणू काही कल्याणमध्ये मेट्रो ट्रेन धावणार आहे. त्यामुळे निवडणुकीत स्थानिकांच्या प्रवासावेळी होणाऱ्या त्रासाचं जसं मार्केटिंग केलं तसंच आता लवकरच वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीकरांची सुटका होणार असल्याने पुन्हा त्यांच्या आनंदाचं दुसरं मार्केटिंग सुद्धा सुरु झालं आहे.
वास्तविक पत्री पुलाला जोडणाऱ्या ९० फुटाच्या रस्त्याचा प्रश्नही अद्याप प्रलंबित आहे. कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम आज सुरु झालं आता पुढचे दोन दिवस हे काम चालणार आहे. या लाँचिंगच्या वेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीवर मनसेने टीका केली आहे.
News English Summary: The Shiv Sena had made a poster campaign in the 2019 Assembly elections that the Kalyan bridge would be started by February 2020 and another new bridge would be built next to this bridge. In other words, Shiv Sena had promised that the bridge would be completed before Corona had no idea in the country. MP Shrikant Shinde and MSRDC officials had inspected the bridge. The bridge was demolished in November 2018 due to dilapidation. After that, Kalyan-Dombivali residents had to face a huge traffic jam. Shiv Sena had marketed the same hoarding in the Assembly elections.
News English Title: Kalyan Patri bridge guarder launching event of Shivsena News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL