23 December 2024 1:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Unlock 5 | राज्यात ग्रंथालये आणि मुंबईतील मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार

Maharashtra, Mumbai metro, Unlock

मुंबई, १४ ऑक्टोबर : उपनगरीय लोकल सेवा आणि मुंबई मट्रो सेवा पूर्ववत कधी सुरू होणार याची लाखो प्रवाशांना प्रतीक्षा असतानाच राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन अंतर्गत खूप मोठा निर्णय आज घेतला आहे. मुंबईतील मेट्रोसेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

देशातील अन्य शहरांतील मेट्रोसेवा केंद्राच्या परवानगीनंतर सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मुंबईतील मेट्रोसेवेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. राज्य सरकारने आज अनलॉक प्रक्रियेत आणखी काही निर्णय घेतले असून त्यात मेट्रो रेल्वे सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यानुसार उद्या गुरुवार दि. १५ ऑक्टोबरपासून मेट्रो सेवा होणार आहे. मेट्रो सेवेसाठी नगरविकास विभागाने जी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत ती या सेवेसाठी लागू असतील. त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

टप्प्याटप्प्याने मुंबईतील मेट्रो सेवा सुरु करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवासादरम्यान मुंबईकरांना होणारा त्रास थोडासा कमी होणार आहे. मेट्रो सेवा सुरु करण्याबाबतची SOP लवकरच नगरविकास विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. याशिवाय, कन्टेनमेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

 

News English Summary: While millions of commuters are waiting to see when the suburban local service and Mumbai Metro service will resume, the state government has taken a big decision today under Mission Begin Again. Metro service in Mumbai has been given a green light.

News English Title: Maharashtra allows Mumbai metro business exhibitions weekly markets from October 15 News updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x