24 January 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | पेन्शनर्ससाठी मोठी बातमी, पेन्शनमध्ये 186 टक्क्यांनी वाढ होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी कमाईची मोठी संधी, प्राईस बँड सह डीटेल्स जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771
x

शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री; वरळीत बॅनर्स झळकले

Yuvasena, Aaditya Thackeray, Shivsena, Worli Constituency

मुंबई: मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. या विजयानंतर शिवसेनेनं सत्तेत समसमान वाटा पाहिजे, अशी भूमिका घेतली असतानाच, आता आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदित्य यांच्या विजयानंतर त्यांच्या वरळी मतदारसंघात त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर झळकले असून, ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख त्यावर करण्यात आला आहे. त्यामुळं आता सत्तेत समान वाटा दिला तर, शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,” अशा आशयाचे बॅनर्स वरळीत लावणअयात आले आहेत. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं अनेक जण त्यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. त्यामुळे अनेकांचं लक्ष या ठिकाणच्या निवडणुकीकडे लागले होते. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती.

शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चेला जोर आला असतानाच, आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन करणारे बॅनर त्यांच्या मतदारसंघात झळकले आहेत. विशेष म्हणजे आदित्य यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे.

ठाकरे घराण्यातील पहिलाच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विधानसभेच्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष वरळीतील निकालाकडे लागले होते. आदित्य ठाकरे यांना विजयी करण्यासाठी संपूर्ण शिवसेना कामाला लागली. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली.

हॅशटॅग्स

#Aditya Thakarey(103)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x