राज्य सरकार आक्रमक | विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी अर्णब गोस्वामीला ६० पाणी पत्रं
मुंबई, १७ सप्टेंबर : रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला मंजुरी देण्याची मागणी सरनाईक यांनी केली होती.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाबाबत अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीने सातत्याने वृत्तांकन केले आहे. मात्र यादरम्यान, अर्णव गोस्वामी यांनी महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात सातत्याने टीका केली होती. तसेच अनेकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना आव्हान देण्याची भाषा केली होती.
प्रताप सरनाईक यांच्या या प्रस्तावानंतर विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला होता. या प्रस्तावानंतर भाजपानं गदारोळ घातला होता. दरम्यान, राज्य सरकार आणि जनतेचा अवमान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली होती.
मात्र त्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून अर्णब गोस्वामीला विशेषाधिकार उल्लंघन प्रकरणी ६० पाणी पत्रं धाडल्याने महाविकास आघाडी सरकार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे अर्णब गोस्वामी याला कसं प्रतिउत्तर देणार ते पाहावं लागणार आहे.
#BREAKING | Maharashtra Assembly sends a 60-page letter to Arnab Goswami on breach of privilege.
Watch here – https://t.co/rGQJsiKgt2
— Republic (@republic) September 17, 2020
News English Summary: A motion for breach of privilege was moved in the Maharashtra Assembly against Republic TV’s Managing Director and Editor-in-Chief Arnab Goswami on Tuesday (September 8). A similar motion was moved in the Maharashtra Legislative Council against actor Kangana Ranaut. The truncated two-day Monsoon Session having ended on Tuesday, the motions could not be taken up by the lawmakers.
News English Title: Maharashtra Assembly sends a 60 page letter to Arnab Goswami on breach of privilege Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो