22 January 2025 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL
x

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra government, cancel, final semester exams of final year

मुंबई, २६ जून : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी. अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यवसायिक (professional) आणि गैर-व्यवसायिक (non-professional) कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. तसंच यामध्ये त्यांनी एआयईसीटीई, सीओए, पीसीआय, बीसीआय, एनसीटीई आणि नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीलाही राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयाला मंजुरी देण्याचे आदेश द्यावी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

यासंदर्भात या अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय शिखर संस्थांना सूचना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे पत्राद्वारे केली आहे. यामध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल कौन्सिल फॉर टिचर्स एज्युकेशन या संस्थांचा समावेश आहे.राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयावर या संस्थांनी शिक्कामोर्तब करावं आणि तसे आपल्या अखत्यारीतील विद्यापीठांना कळवावं, अशी विनंतीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानाना लिहिलेल्या पत्रात केली आहे.

 

News English Summary: Big news for students in Maharashtra. The state government has decided to cancel the final semester exams of final year students. In this, the state government has canceled the examinations of all the students doing the last semester of the final year of doing professional and non-professional courses.

News English Title: Maharashtra government has decided to cancel the final semester exams of final year students News latest Updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x