21 November 2024 8:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत

Maharashtra, Covid 19, Private Hospitals

मुंबई, ६ जून: खासगी रुग्णालयाने कोरोना रुग्णांना लुटत असल्याने दर निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. खासगी रुग्णालयातील कोरोना चाचणीचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती स्थापन केली असून ही समिती हे दर ठरवणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील प्रयोगशाळांची पूर्णक्षमतेने वापरण्यासाठी व जास्तीतजास्त चाचण्या होण्यासाठी राज्य शासनाने राज्य आरोग्य हमी सेवा सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ, सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुल्क निश्चिती समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक अजय चंदनवाले, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रा. अमिता जोशी हे सदस्य असून आरोग्य सेवा संचालक सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आयसीएमआरने आरटी-पीसीआर तपासणीची सुविधा असलेल्या ४४ शासकीय आणि ३६ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणीची मान्यता दिली आहे. शासकीय प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या निशुल्क केल्या जात आहेत. खासगी प्रयोगशाळांसाठी आयसीएमआरने ४५०० रुपये इतकी दरनिश्चिती केली होती. याकाळात तपासणी चाचण्यांसाठी आवश्यक असणारे किटस् परदेशातून आयात करावे लागत होते. मात्र आता असे किटस् देशातच तयार होत आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळांशी वाटाघाटी करून कोरोना तपासणी दर निश्चित करण्याबाबत आयसीएमआरने कळविले आहे.

ही समिती सर्व जिल्ह्यातील आयसीएमआर मान्यता प्राप्त खासगी प्रयोगशाळांशी करोना चाचण्यांच्या दर निश्चीती बाबत वाटाघाटी करून सात दिवसात दर निश्चीत करतील. जिल्हानिहाय निश्चित केलेले दर ही समिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल त्याआधारे जिल्हाधिकारी दरनिश्चितीसाठी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित जिल्ह्यांसाठी दर निश्चिती करतील. जिल्हाधिकारी निविदा प्रक्रिया पूर्ण करून दर निश्चिती होईपर्यंत या समितीने त्या जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या दरानुसार संबंधित प्रयोगशाळेला शुल्क आकारता येईल.

दरम्यान, राज्यात आज दिवसभरात २७३९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात १२० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २२३४ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३७ हजार ३९० कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात ४२ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८२ हजार ९६८वर पोहचली आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत राज्यात २९६९ जणांचा मृत्यू झाला आहे.

आज २२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ४२ हजार ६०० रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. आज राज्यात २७३९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात करोनाग्रस्तांची संख्या ८२ हजार ९६८ इतकी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४५.६ टक्के इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.५७ टक्के इतका झाला आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ४६ हजार ५६६ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर २९ हजार ९८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आज १२० करोना रुग्णांचा मृत्यू झाला. मागील २४ तासांमध्ये नोंद झालेल्या १२० मृत्यूंपैकी ७८ पुरुष होते तर ४२ महिला होत्या.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope said a committee has been constituted to fix the rates as private hospitals are robbing Corona patients. The state government has set up a four-member committee to determine the rates for corona testing at private hospitals, Health Minister Rajesh Tope said.

News English Title: Maharashtra government has set up a four-member committee to determine the rates for corona testing at private hospitals, Health Minister Rajesh Tope said News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x