23 February 2025 2:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

महाराष्ट्र सरकार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार

Covid 19, Corona virus, Remedivir injections, Rajesh Tope

मुंबई, ६ जून: ठाकरे सरकार रेमडेसिवीर औषधाची १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दलची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना रेमडेसिवीरचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवलं असल्याचं टोपेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळेच राज्य सरकार या औषधाची इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याची माहिती टोपेंनी ट्विटमधून दिली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र शासन रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार आहे. प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोना व्हायरसमुळे होतो”. पुढे त्यांनी सांगितलं आहे की, “जागतिक आरोग्य संघटना करोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात असं सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली आहे”.

रेमडेसिवीर औषधाची विक्री करण्याची परवानगी अमेरिकन कंपनी जिलाद सायन्सेसनं आठवड्यापूर्वीच भारत सरकारकडे मागितली आहे. तत्पूर्वी अमेरिकेतल्या संशोधकांनी महिनाभर रेमडेसिवीर आणि या औषधाचा कोरोना रुग्णांवरील उपचारातील उपयोग यावर संशोधन केलं. कोरोनावरील उपचारांमध्ये रेमडेसिवीरचा वापर करू देण्याची मागणी डॉक्टर अनेक दिवसांपासून करत आहेत. रेमडेसिवीर औषध कोरोना रुग्णांवरील उपचारांत प्रभावी ठरत असल्याचं अमेरिकेत आढळून आलं आहे. मात्र यावर भारतात अद्याप तरी कोणतंही संशोधन झालेलं नाही.

 

News English Summary: The Thackeray government will buy 10,000 injections of remedivir. Health Minister Rajesh Tope has informed about this. Tope said in a tweet that the World Health Organization (WHO) has shown positive effects of remedivir in treating corona patients.

News English Title: Maharashtra Thackeray government will buy Ten Thousand injections of remedivir News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x