23 February 2025 10:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

वरळीचा कंटेनमेंट झोन ते डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता - आदित्य ठाकरे

Covid 19, Mumbai Worli, De Containment Zone, Aaditya Thackeray

मुंबई, १ जून: महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी दिवसभरात २ हजार ४८७ नव्या रुग्णांची भर पडल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ६७ हजार ६५५ वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात ८९ रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यातील कोरोनाबळींची संख्या २ हजार २८६ इतकी झाली आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात १ हजार २४४ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ३९ हजार ६८६ वर पोहोचली आहे. तसेच मुंबईत काल ५२ जणांनी कोरोनामुळे जीव गमावल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा १ हजार २७९ वर पोहोचला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये कोरोना विषाणूचीच दहशत पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही गेल्या रुग्णसंख्या वाढीचा वेग मुंबईसारख्या शहरात काहीसा मंदावत असल्यामुळं आरोग्य खातं आणि प्रशासनाला एक दिलासा मिळाला आहे. त्यातच मुंबईतील पहिला कंटेनमेंट म्हणून घोषित करण्यात आलेल्या वरळी भागातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेले काही निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.

वरळीचा कंटेनमेंट झोनपासूनचा डी- कंटेनमेंट होण्यापर्यंतचा हा प्रवास फारसा सोपा नव्हता. पण, तरीही या भागातील नागरिकांचं सहकार्य, प्रशासनाचे अथक परिश्रम या साऱ्याच्या बळावर संकटावर नियंत्रण ठेवणं शक्य झाल्याची दिसादायक प्रतिक्रिया वरळी विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

‘हा पहिला कंटेनमेंट झोन असल्याने कंटेनमेंट झोनच्या व्यावहारिक अडचणींबद्दल आपण पहिल्यांदाच अनुभवत असलेल्या समस्यांचा सामना केला. इतर भागांमध्ये कोविडशी लढण्यासाठी हे एक मॉडेल ठरले. तेथील रहिवाशांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे वरळी कोळीवाडा, जिथे सर्वप्रथम जास्त रुग्ण सापडले होते आणि कंटेनमेंट झोन बनविला गेला होता तिथे आता डी-कंटेनमेंट करण्यात आले आहे. केवळ ऍक्टिव्ह रुग्ण असलेले ठिकाणे सील केली आहेत’, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं.

 

News English Summary: The journey from Worli’s containment zone to de-containment was not an easy one. However, Aditya Thackeray, who was elected from Worli Assembly constituency, has given a visible response that it was possible to control the crisis with the help of the citizens of the area and the tireless efforts of the administration.

News English Title: Mahavikas Aghadi Minister Aaditya Thackeray on Worli De containment amid corona virus Covid 19 outbreak lockdown News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x