22 January 2025 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
x

भाजपात राजकीय भूकंप निश्चित | खडसेंसहित अनेक आमदार पक्ष सोडणार

Many BJP MLAs, Eknath Khadse, Minister Jayant Patil

मुंबई, २१ ऑक्टोबर: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीमधील आता निश्चित झाला आहे. एकनाथ खडसे यांनी आज (२१ ऑक्टोबर) भाजपला रामराम ठोकला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.

अनेक वर्षांचा अनुभवी नेता, राज्यातील विविध विषयाचा अभ्यास असणारा नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचे स्वागत आम्ही करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादीला बळ मिळेल. राष्ट्रवादीकडून त्यांना योग्य तो सन्मान दिला जाईल असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

तसेच पुढील येणाऱ्या काळात अनेक भूकंप पाहायला मिळतील, एकनाथ खडसेंसोबत येण्यासाठी अनेक आमदार इच्छुक आहेत. राजीनामा देऊन कोरोना काळात विधानसभा निवडणुका घेणं शक्य नसल्याने हळूहळू त्याबाबत निर्णय होईल. ज्यांना तांत्रिक अडचणी आहेत ते नंतर येतील, एकनाथ खडसेंसोबत कोण येणार याबाबत फारशी चर्चा केली नाही, खडसेंचे नेतृत्व मानणारे, भाजपाकडून ज्यांचा हिरमोड झाला आहे ते सगळी लोकं राष्ट्रवादीत येतील असंही जयंत पाटील यांनी सांगितले.

 

News English Summary: Senior BJP leader Eknath Khadse has now been confirmed in the NCP. Eknath Khadse has beaten BJP today (October 21). Meanwhile, against this backdrop, NCP state president Jayant Patil has officially announced Khadse’s entry. Jayant Patil has announced that Eknath Khadse will join the NCP on Friday, October 23 at 2 pm. Jayant Patil has made this announcement in a press conference.

News English Title: Many BJP MLAs are preparing to leave the party along with Eknath Khadse Jayant Patil News updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x