माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे | उघड केल्यास अनेकांना हादरा बसेल | खडसेंचा गौप्यस्फोट
मुंबई, १२ सप्टेंबर : मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यांनी त्यांच्या कन्येची शपथ घेऊन मला राज्यपाल करणार असल्याचं सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
मी विधानसभेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला त्यांच्या अँटिचेंबरमध्ये बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती. त्यावेळी मला काही राज्यपालपदाची इच्छा नाही असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा मुलीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला राज्यपाल करणार आहोत आणि पक्षश्रेष्ठीची त्याला संमती असल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं, असं खडसे यांनी म्हटलं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे यांनी हा गौप्यस्फोट केला.
राज्यपाल पद मिळाले नाही. त्यानंतर फडणवीस यांनी मला पुन्हा राज्यसभेत पाठवणार असल्याचं सांगितलं. राज्यातून राज्यसभेसाठी कुणीही जाणार नाही. फक्त तुमचंच नाव पाठवणार आहोत आणि तुमचं नाव पाठवण्यास पक्षश्रेष्ठींची काहीच हरकत नसल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं होतं. पण नंतर चार दुसरीच नावं आली, असंही त्यांनी सांगितलं.
त्याचसोबत माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर धक्का बसेल, मी इतक्या खालची पातळीचं राजकारण करत नाही, वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारखं मी चुका केल्या नाहीत, या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर हे मांडले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन.काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
दरम्यान, ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही आक्षेप माझ्यावर आला नाही, माझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही. पक्षातंर्गत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर नैतिक पदावरुन राजीनामा दिला. नंतर सरकारच्या काळात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एक्सिस बँकेबाबत आरोप झाला. पदाचा दुरुपयोग झाला असं म्हटलं मग मला एक न्याय आणि दुसऱ्याला वेगळा त्या वेदना आणि खंत माझ्या मनात नेहमी राहणार आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादायी होतं, मला राजीनामा देण्याबाबत सांगितलं होतं असं एकनाथ खडसे म्हणाले.
News English Summary: After resigning from the ministry, the then Chief Minister and BJP leader Devendra Fadnavis had offered me the governorship. Senior BJP leader Eknath Khadse has revealed that he had sworn in his daughter and made her governor.
News English Title: Many would be shocked if the video clip, documents were revealed; BJP Eknath Khadse Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो