23 January 2025 3:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

मनसेत मेगाभरती; हर्षवर्धन जाधव, सुहास दाशरथे आणि प्रकाश कौडगे यांचा मनसेत प्रवेश

Former MLA Harshavardhan Jadhav, MNS Mega Bharti, Hindutva

मुंबई : मुंबई आणि देशभरात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोर्चापूर्वी मनसेमध्ये मोठ्या प्रमाण इनकमिंगला सुरुवात झाली आहे. आज कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

दरम्यान, हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांच्यासह शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे यांनी देखील मनसेत प्रवेश केला आहे. मनसेने भगव्या हिंदुत्वाचा राजकीय मार्ग स्वीकारल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतील नेत्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात झाली आहे आणि त्यात मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. त्यात २-३ महिन्यावर आलेल्या औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत मनसे हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याने स्थानिक पातळीवर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे, ते शिवसेनेचे नांदेडमधील प्रमुख पदाधिकारी होते.

राज ठाकरे देखील महामोर्चा पार पडल्यानंतर लगेचच मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याने मराठवाडा मनसेच्या अग्रस्थानी असणार आहे. लवकरच औरंगाबाद, नवी-मुंबई आणि कल्याण-डोंबिवली या महत्वाच्या महानगर पालिकेच्या निवडणुका असल्याने मनसे पूर्ण ताकदीने या निवडणुकीत उतरणार असल्याचं पक्षाने स्पष्ट केलं असून तसेच संकेत सध्या या मेगाभरतीतून मिळत आहेत.

उद्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ९ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. परंतु मोर्चाच्या काही तास आधी मुंबई पोलिसांकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे स्वतः राज ठाकरे मोर्चात सहभागी होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.

 

Web Title:  Mega Bharati in MNS many leaders including former MLA Harshvardhan Jadhav joined MNS Party.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x