करण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत
मुंबई, २७ जुलै : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून तिने हा मोठा खुलासा केल्याचं निदर्शनास येत आहे. ‘मुंबई पोलीस स्पष्टपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. पण करण जोहरला नाही. त्याच्या ऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का?’ साहेबांना त्रास होवू नये का? असा प्रश्न यावेळी तिने उपस्थित केला.
‘समन्स जारी करतानाही मुंबई पोलीस इतका निर्लज्जपणा व दुजाभाव कसा दाखवू शकतात? कंगनाला समन्स पाठवण्यात आला आहे तिच्या मॅनेजरला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांचा मुलाच्या बेस्ट फ्रेन्डच्या मॅनेजरला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. का? साहेबांना त्रास होऊ नये म्हणून?, असे कंगनाने दुस-या ट्वीटमध्ये म्हटले.
सुशांतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भटयांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे काल अनिल देशमुख यांनी सांगितले होते.
News English Summary: After the suicide of actor Sushant Singh Rajput, the controversy over the dynasty in Bollywood seems to be burning well. The main thing is that in the midst of this controversy, actress Kangana Ranaut has now dragged the state’s environment minister and Shiv Sena leader Aditya Thackeray.
News English Title: Minister Aaditya Thackeray is a friend of Karan Ranaut thats why he is not being questioned News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार