22 December 2024 12:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN
x

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे OSD यांना शिवीगाळ, शिंदे समर्थकांकडून शिंदेंना त्यांची जागा दाखवण्यास सुरुवात?

Minister Abdul Sattar

MInister Abdul Sattar | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्याच विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे शिंदे गटाच्या नेत्यांना धक्का बसला. शिंदे गटातील मंत्र्यांनी आणि आमदारांनी या प्रकरणी मध्यस्थी केली. शिविगाळ प्रकरणानंतर सत्तार यांनी वर्षा बंगल्यातील बैठक अर्ध्यावर सोडली आणि माघारी गेले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मात्र, या बैठकीमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. बैठकीतच अब्दुल सत्तार यांनी आपलं काम केलं नसल्याचा राग ठेवत OSD यांना शिवीगाळ केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिंदे यांनी सत्तार यांची समजूत काढली. पण, रागाच्या भरात सत्तार हे बैठकीतून निघून गेले. या घटनेमुळे वर्षा बंगल्यावर काही काळ तणावाचे वातावरण होते.

सत्तार यांच्या वागणुकीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिविगाळ करणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले जात आहे.

शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीमुळे आधीच सरकारबद्दल नाराजी आहे. त्यातच आता सत्तार यांच्या या प्रकरणामुळे शिंदे गटाची आणि सरकारच्या प्रतिमेला तडा जात आहे. याआधीदेखील भाजप नेत्यांनी शिंदे गटातील आमदारांच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Abdul Sattar angry on CM Shinde’s OSD check details 10 October 2022.

हॅशटॅग्स

#Minister Abdul Sattar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x