22 January 2025 12:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील
x

मनसे सुपारी घेऊनच काम करतात | नागड्यासोबत उघडा झोपल्यावर काय होतं ते दिसेल - शिवसेना

Minister Anil Parab, Serious allegations, On MNS party, Raj Thackeray

मुंबई, २३ नोव्हेंबर: महाविकास आघाडीची स्थापना करून शिवसेनेच्या पदरात मुख्यमंत्रीपद पडलं आणि भारतीय जनता पक्षाचा राजकीय गेम केल्यानंतर भाजपचे नेते शहरी भागातील मराठी मतांवरून चिंतेत आहेत. आगामी महानगरपालिका निवडणुकीत अमराठी मतच भाजपच्या केंद्रस्थानी असतील असं राजकीय विश्लेषक मत मांडत आहेत. पण मराठी मतदार हा शिवसेनेचा बेस असल्याने भाजपाला मराठी मतांसाठी दुसरा साथीदार हवा आहे. त्यामुळे मनसे संबंधित निवडणूक पूर्व पुड्या सोडण्यास भाजपकडून सुरुवात झाली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यंदा सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचाच भगवा फडकेल, अशी गर्जना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना प्रत्युत्तर दिलं. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल उत्सुकता वाढवणारं विधान केलं. यानंतर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

यातच परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेना संभाव्य युतीवर भाष्य करताना मनसेवर बोचरी टीका केली. अनिल परब म्हणाले की, मुंबई महापालिकेत बदलत्या राजकारणाची नांदी आहे की नाही हे माहिती नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही, त्यामुळे कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल, मनसेचं अस्तित्व सुपारीवर चालू आहे, आतापर्यंत विविध पक्षांची सुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने घेतली आहे. ज्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना लोकसभेत लाव रे तो व्हिडीओ माध्यमातून उघडंनागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते ही कदाचित पुढे दिसेल. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल असा विश्वास आहे.

 

News English Summary: Transport Minister and Shiv Sena leader Anil Parab, while commenting on a possible Bharatiya Janata Party-Maharashtra Navnirman Sena alliance, slammed the MNS. Anil Parab said that it is not known whether the Mumbai Municipal Corporation is the forerunner of changing politics or not, Maharashtra Navnirman Sena cannot function without taking betel nut, so they will have to take someone’s betel nut . The leaders of the Bharatiya Janata Party (BJP) who were exposed in the Lok Sabha were exposed through video, so now we will see what happens if we go to bed naked. It is believed that Shiv Sena will win the Mumbai Municipal Corporation elections.

News English Title: Minister Anil Parab made serious allegations over MNS party news updates.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x