5 November 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं - अशोक चव्हाण

Minister Ashok Chavan, Congress President Rahul Gandhi

मुंबई, २४ ऑगस्ट : नेतृत्वाच्या मुद्यावरुन काँग्रेसपक्षांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे. २३ काँग्रेसच्या नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. त्यानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावान असलेले नेते सक्रिय झाले आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही याबाबत आपली भूमिका माडंली असून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचं नेतृत्व करावं असं मत त्यांनी मांडलं आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारवं या निवेदनाचं एक पत्र ट्विटरवर पोस्ट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, ‘पक्षाला एकजीव ठेवण्याची, बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे आणि इतिहासातही हे अनेकदा सिद्ध झाले आहे. पक्षाच्या अध्यक्ष पदासंदर्भात काँग्रेस कार्यसमिती निर्णय घेईल. परंतु, खा. राहुलजी गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकारावे, अशी कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे. खा. राहुलजी गांधी हे सक्षम, संयमी व संवेदनशील नेते आहेत.’

दुसरीकडे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव सातव यांनीही सोनिया गांधी यांना पत्र लिहून या भूमिकेला पाठिंबा दर्शविला आहे. या पत्रात सातव यांनी सोनियांना उद्देशून म्हटले आहे की, तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत आहात, हे आम्हाला माहिती आहे. तरीही तुम्हीच पक्षाचे नेतृत्त्व करावे, ही आमची नम्र विनंती आहे. काँग्रेस पक्ष हा केवळ तुमच्या किंवा राहुलजींच्या हातात सुरक्षित आहे. आता किंवा भविष्यात तुमच्याशिवाय इतर कोणीही काँग्रेस पक्षाला न्याय मिळवू देऊ शकत नाही, असे राजीव सातव यांनी म्हटले आहे.

 

News English Summary: There is a picture of two factions in the Congress party on the issue of leadership. 23 Congress leaders in a letter demanded an immediate solution to the party leadership issue. Since then, leaders loyal to the Gandhi family have become active. Former Chief Minister Ashok Chavan has also expressed his views on the issue and said that Rahul Gandhi should lead the party once again.

News English Title: Minister Ashok Chavan Congress President Rahul Gandhi News Latest Updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x