22 January 2025 1:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

ग्रामपंचायत निवडणुकीत पण निवडून येणार नाही | माध्यमं जास्तंच महत्व देत आहेत

Minister Bacchu Kadu, Kangana Ranaut, Marathi News ABP Maza

अमरावती, १६ सप्टेंबर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांवर कंगनानं केलेल्या टीकेमुळे या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर कंगनानं शिवसेनेविरोधात सोशल मीडियावर मोर्चा उघडला. कंगनाच्या ट्विटला सुरुवातीला खासदार संजय राऊत यांनीही जोरदार उत्तर दिलं. त्यानंतर हा वाद आणखी पेटतच गेला.

हा वाद चिघळतोय हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात बैठक पार पडली. यानंतर शिवसेनेने कंगना राणौत या विषयावर पडदा टाकला. कंगनाकडून शिवसेनेवर आता कितीही टीका झाली तरी त्याला शिवसेनेकडून उत्तर न देण्याची भूमिका पक्षाने घेतली.

त्यात आता मंत्री बच्चू कडू यांनी कंगना राणौतची जोरदार खिल्ली उडवली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानंदेखील कंगनाला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत उभं केलं तरी निवडून येणार नाही. एवढचं नाही तर तिचं डिपॉझिटही जप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं असून जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं म्हटलं असून शय्यासोबत केल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही”.

इतर महत्वाच्या बातम्या:

एअर इंडियाला खरेदीदार न मिळाल्यास कायमची बंद करणार | मोदी सरकारची माहिती

इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक | केंद्राची माहिती

Sarkari Naukri | बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीची मोठी संधी | ऑनलाईन अर्जाला सुरुवात

Health First | झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा ही वस्तू | चेहरा चमकेल | चेहऱ्यावरील खड्डे गायब होतील

Health First | कडीपत्त्याचे चमत्कारिक फायदे | फायदाच फायदा होईल | नक्की वाचा

दिशाच्या लिव्ह इन पार्टनरचा जबाब महत्त्वाचा | नितेश राणेंच अमित शहांना पत्र

अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही | RBI गव्हर्नर

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक चिघळेल | संभाजीराजेंचा इशारा

 

News English Summary: Minister Bachchu Kadu has ridiculed Kangana Ranaut. Kangana has no reason to destabilize the state government. The media does not need to give much importance to Kangana. Even if Kangana is fielded in the Gram Panchayat elections, she will not be elected. Not only that, but her deposit will not last without confiscation, he said.

News English Title: Minister Bacchu Kadu criticized Kangana Ranaut over politics Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#BacchuKadu(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x