16 April 2025 11:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक BUY, SELL की Hold करावा? तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: IDEA AWL Share Price | अदानी विल्मर शेअर देईल तगडा परतावा, 49 टक्के अपसाईड कमाईची संधी, अपडेट नोट करा - NSE: AWL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER Trident Share Price | संयम ठेवल्यास हा पेनी स्टॉक श्रीमंत करू शकतो, यापूर्वी दिला 5322 टक्के परतावा - NSE: TRIDENT SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

मातोश्री हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान | दाऊदच्या बापालाही आम्ही घाबरत नाही - एकनाथ शिंदे

Minister Eknath Shinde, CM Uddhav Thackeray, Dubai Dawood, Marathi News ABP Maza

मुंबई 6 सप्टेंबर: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकानं दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री परिसरात धावपळ उडाली आहे. मातोश्रीवर दुबईतून चार कॉल आल्याचं वृत्त आहे. त्यामुळे मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.

दरम्यान, ‘मातोश्री’ हे मराठी माणसाचं श्रद्धास्थान आहे. दाऊदच काय किंवा त्याचा बापानं जरी धमक्या दिल्या तरी आम्ही घाबरत नाही!, अशा शब्दात शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, स्वत: दाऊद दुसऱ्यांच्या आश्रयानं राहत आहे. मातोश्री सोडून द्या शिवसैनिकाच्या केसालाही कोणाला धक्का देऊ शकत नाही. यापूर्वीही अशा धमक्या पाकिस्तानातून आल्या होत्या. अशा पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.

 

News English Summary: Matoshri ‘is a place of worship for a Marathi man. We are not scared even if Dawood or his father threatens us !, said Shiv Sena leader and Urban Development Minister Eknath Shinde.

News English Title: Minister Eknath Shinde reaction on CM Uddhav Thackeray receives death threat gets from Dubai Dawoods name Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#EknathShinde(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या